Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
सकाळी डोळे उघडल्या उघडल्या हातात आलेला मोबाईल, रात्री झोपेनं डोळे मिटेल्यावरही हातातून सुटत नाही, अशी आपल्यापैकी अनेकांची अवस्था, त्यातही लहान मुलं, विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण कधीच धोक्याच्या पातळीवर पोहोचलंय. यावर उपाय शोधलाय सांगली जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावानं.
अग्रण धुळगावात रोज दिवसातले ४ तास घरात मोबाईल टीव्ही कम्पलसरी बंद केला जातो, अभ्यासाचा भोंगा वाजतो आणि मुलं अभ्यासाला बसतात. या गावात डिजिटल डिटॉक्स गेले तीन वर्ष पाळला जातोय. मोहित्यांचं वडगाव असो किंवा अग्रण धुळगाव यांचा आदर्श इतर गावं घेतील? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्रातल्या कोणत्याही सर्वसामान्य खेडेगावातली ही संध्याकाळ आहे
प्रत्येक गावात असते तशीच इथे गजबज, लगबग सुरु आहे
खेळकर, खोडकर मुलांचा किलबिलाट कानी पडतोय
दिवसभर शाळा-ट्यूशन केल्यानंतर लहान मुलं विरंगुळा म्हणून
कुठे शिवनापाणी, पकडापकडी खेळतायत (याचे व्हिज आहेत, एम्बियन्सवर थोडं खेळलं तरी चालेल)
तर
कुठे मोठ्यांच्या मार्गदर्शनात व्यायाम करतायत
(व्हिज आहेत)
एवढ्यात एक आवाज येतो
आणि
सगळं चित्र बदलतं
(सायरनचा आवाज)
मुलं खेळ, व्यायाम विसरतात
सगळं जागेवर सोडून घराकडे धुम ठोकतात
एका क्षणात सगळा किलबिलाट, कलकलाट शांत होतो
कारण हा आवाज असतो भोंग्याचा..
सायरनचा..
आणि हा भोंगा आहे...
अभ्यासाचा भोंगा
अभ्यासाचा भोंगा वाजला की गावातल्या सगळ्या घरात टीव्ही, मोबाईल बंद होतात
आणि शाळा कॉलेजमधले मुलं अभ्यासाला बसतात
गेले तीन वर्षांपासून पहाटे ५ ते ७ आणि संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत हा उपक्रम राबवला जातोय.
अग्रण धुळगाव या गावानं मोबाईलच्या वापरावर निर्बंध घालून घेतले आहेत.
ग्रामपंचायत आणि अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रानं या कामात पुढाकार घेतलाय.
BITE- शिवदास भोसले, सरपंच, अग्रण धूळगाव
बाईट-: प्रकाश भोसले, नागरिक
बाईट-; बाळकृष्ण भोसले, नागरिक
VO-
अभ्यासाचा भोंगा या उपक्रमानंतर मुलांची शैक्षणिक गुणवत्ता इतकी वाढली की
GFX IN
गावातल्या ५३ मुलाना नॅशनल स्कॉलरशिप मिळाली,
दहावी बोर्ड परीक्षेत गावातील अनेक मुले अव्वल आहेत.
शिवाय लष्कर, एन डी ए, सिडीएस, नेव्ही, एअर फोर्स मध्ये या गावातील मुलं निवडली जातायत.
अग्रण धुळगाव गावातील आजी व माजी सैनिकांनीही या उपक्रमास हातभार लावला आहे.
गावातील प्रत्येक शिक्षकांनीही ३० ते ४० घरे वाटून घेतली आहेत.
ते दररोज मुलांच्या घरी भेट देऊन ते अभ्यासात काही अडचणी असतील तर सोडवण्यास मदत करतात.
GFX OUT
बाईट-: तुषार जाधव, नागरिक
बाईट-: दिव्याप्रभा जाधव, महिला
बाईट-:प्रियाका भोसले, महिला
बाईट-: गोपाळ कनप, शिक्षक
बाईट-:-सुजाता मोरे, शिक्षक
बाईट/: रिया जाधव, विद्याथीनी
बाईट-:वैष्णवी कदम, विद्याथीनी
सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी देखील या उपक्रमाची प्रत्यक्ष पाहणी करत कौतुक केले.
बाईट-: अशोक काकडे, जिल्हाधिकारी, सांगली
All Shows

































