एक्स्प्लोर
Nagpur Leopard: डार्ट लागून गुंगीचं औषध शरीरात भिनलं, तरीही बिबट्याची 15 फूट उंच उडी, अखेर गच्चीतून खाली पडला, नागपूरमध्ये बिबट्याला पकडण्याचा थरार
Nagpur leopard attack news: नागपुरात बिबट्याचा धुमाकूळ; परडीत वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन, अनेकांवर हल्ला केल्याची माहिती. या बिबट्याला पकडण्यात आले आहे.
Nagpur leopard attack
1/12

नागपूरच्या शिवनगर परिसरात दाट लोकवस्तीमध्ये बिबट शिरल्यामुळे मोठी खळबळ माजली. या बिबट्याला एक तासाच्या रेस्क्यू ऑपरेशनंतर पकडण्यात आले आहे.
2/12

सकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान बिबट्याने या परिसरातील चार जणांना जखमी केले होते. त्यानंतर पोलिसांनी बिबट लपून बसलेल्या घराच्या अवतीभवती कडक पहारा ठेवला होता.
3/12

वनविभागाने याठिकाणी आल्यानंतर या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
4/12

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंदुकीतून बिबट्याच्या शरीरावर दोन डार्ट मारले.
5/12

हे डार्ट लागल्यानंतर गुंगीचे औषध बिबट्याच्या शरीरात भिनायला लागले.
6/12

मात्र, त्याअवस्थेतही बिबट्याने 15 फूट उंच उडी मारली आणि दुसऱ्या गच्चीत जाण्याचा प्रयत्न केला.
7/12

मात्र, डोळ्यांवर गुंगीची झापड असल्यामुळे या बिबट्याला गच्चीत नीट चढता आले नाही.
8/12

गुंगीचे औषध शरीरात भिनल्यामुळे हा बिबट्या गच्चीतून पुन्हा खाली पडला.
9/12

हा बिबट्या खाली पडू नये, यासाठी धडपड करत होता. मात्र, अखेर तो गच्चीतून खाली पडला.
10/12

हा बिबट्या खाली पडल्यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला उचलले.
11/12

हा बिबट्या उंचीवरुन खाली पडल्यामुळे त्याला दुखापत झाल्याची शक्यता आहे.
12/12

बघ्यांची मोठी गर्दी आणि सातत्याने केल्या जाणारा आवाज यामुळे बिबट्याला पकडण्यामध्ये अडचणी आल्या.
Published at : 10 Dec 2025 10:43 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























