एक्स्प्लोर

Nagpur Leoprad : नागपुरात बिबट्याचा धुमाकूळ; परडीत वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु, अनेकांवर हल्ला केल्याची माहिती

Nagpur News: नागपुरातील पारडी शिवरामध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान बिबट्याने या परिसरातील चार जणांना जखमी केले असून चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nagpur News: नागपुरातील पारडी शिवरामध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी कापसी भागामध्ये बिबट्या दिसून आला होता, मात्र त्यावेळेस सर्चिंग केल्यावर बिबट्या मिळून आलेला नाही. दरम्यान, त्याच बिबट्याने आज पहाटे दोन पेक्षा अधिक लोकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. तर दोन ते तीन जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. भरवस्तीत अचानक बिबट्या आढळून आल्याने परिसरात मोठा पोलीबंदोबस्त (Nagpur Leoprad Rescue Operation) तैनात करण्यात आला आहे. सोबतच परिसरात बघ्यांची मोठ्या प्रमानात गर्दी झाली आहे.

Nagpur Leoprad : नागरिकांमध्ये भीतीच वातावरण, चौघांवर रुग्णालयात उपचार

नागपूरच्या शिवनगर परिसरात दाटलोक वस्तीमध्ये बिबट शिरल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. सध्या बिबट वर्मा कुटुंबीयांच्या घरी लपून बसला असल्याची माहिती आहे. सकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान बिबट्याने या परिसरातील चार जणांना जखमी केले असून चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वनविभाग तसेच पोलिसांनी बिबट लपून बसलेल्या घराच्या अवतीभवती कडक पहारा ठेवला आहे. मात्र बघ्यांची मोठी गर्दी आणि सातत्याने केल्या जाणारा आवाज यामुळे बिबट्याला पकडण्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. मात्र वन विभागाची रेस्क्यू टीम उशीरा स्पॉटवर पोहोचली सल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Nagpur Leoprad Rescue Operation : वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

दरम्यान, सध्या वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचले असून बिबट्याला ट्रॅक्युलाईज करण्यासाठीची तयारी सुरू केली. त्यासाठी वन विभागाचे वैद्यकीय तज्ञ आवश्यक सह डार्टची तयारी करत आहे. दुसऱ्या बाजूला वन विभागाचे पथक बिबट लपून बसलेल्या पांढऱ्या घराच्या मुख्य दाराला जाळी बांधण्याचा प्रयत्न करत आहे. बिबट त्या ठिकाणातून निसटणार नाही यासाठी ही जाळी बांधली जात आहे.

दुसरीकडे नागपुरात बिबट्यानं आणखी एक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील परमात्मा आश्रम परिसरात गोठ्यात बांधलेल्या गुरावर बिबट्याने हल्ला केल्याने दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. तर वनविभागाने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा
Pune Viral Appa : अप्पाचा विषय लय हार्ड है, सोशल मीडियावर धुमाकळू घालणारे आजोबा 'माझा'वर
Atul Londhe Congress : आमचा दावोसला विरोध नाही, पण मॅग्नेटिक महाराष्ट्रचं काय झालं? महायुतीला सवाल
Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं, शाळेच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Chhagan Bhujbal: महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही छगन भुजबळ सहीसलामत सुटले; निर्दोष मुक्ततेचा अर्ज कोर्टाकडून मंजूर
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही छगन भुजबळ सहीसलामत सुटले; निर्दोष मुक्ततेचा अर्ज कोर्टाकडून मंजूर
Sinhgad Institute Crisis: पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांचे तब्बल सोळा महिन्यापासून पगार थकले; कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांचे तब्बल सोळा महिन्यापासून पगार थकले; कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
T20 World Cup: बांगलादेशनं वर्ल्डकपला नकारघंटा दिली, आता पाकिस्तानचा माजी कॅप्टन स्वत:च्याच क्रिकेट बोर्डाला चॅलेंज करत म्हणाला, 'हिंमत असेल तर...'
बांगलादेशनं वर्ल्डकपला नकारघंटा दिली, आता पाकिस्तानचा माजी कॅप्टन स्वत:च्याच क्रिकेट बोर्डाला चॅलेंज करत म्हणाला, 'हिंमत असेल तर...'
Gold Silver Rate : सराफा बाजारात चांदीचे दर 19000 रुपयांनी वाढले, सोनं  4300 रुपयांनी महागलं, पुन्हा उच्चांक गाठला, जाणून घ्या नवे दर
सराफा बाजारात चांदीचे दर 19000 रुपयांनी वाढले, सोनं  4300 रुपयांनी महागलं, पुन्हा उच्चांक गाठला
Embed widget