एक्स्प्लोर
Aadivasi Protest Nagpur: आदिवासी गोंड गोवारी समाजाचे तीव्र आंदोलन; प्रलंबित मागण्यांसाठी हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर
Nagpur News: आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरातील संविधान चौकात समितीचे 3 आंदोलक मागील 11 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे.

(Photo Credit: Abp Majha Nagpur Reporter )
1/10

आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी गोड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे.
2/10

नागपुरातील संविधान चौकात समितीचे 3 आंदोलक मागील 11 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे.
3/10

गेल्या 26 जानेवारीपासून या आंदोलकांनी नागपुरात आमरण उपोषण सुरु केले.
4/10

मात्र, या उपोषणाकडे शासनाने पूर्णता दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
5/10

दरम्यान उपोषणावर असलेल्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
6/10

शासनाच्या या कृती विरोधात आदिवासी गोडगोवारी समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
7/10

परिणामी याविरोधात नागपूरातील संविधान चौकात समाज बांधवांकडून आपले अधिकार आणि हक्कासाठी आज 5 फेब्रुवारीला भव्य मोर्चा काढला.
8/10

शासन मागण्यांना घेऊन गंभीर नसून फक्त आश्वासन देऊन समाजाची दिशाभूत केली जात आहे.
9/10

खुद्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपोषण मंडपात भेट देत नाही, तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहिल, असा इशारा या मोर्चातून देण्यात आला आहे.
10/10

आज या आंदोलनामुळे नागपुरातील संविधान चौक परिसरात वाहतूक व्यवस्था काही काळ बंद झाली होती.
Published at : 05 Feb 2024 07:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion