एक्स्प्लोर
4 एक्के...जय जवानचे मुंबईत कडक 9 थर; यंदा 10 थर रचून विश्वविक्रम करण्यासाठी सज्ज, Photo
Dahihandi 2024 Jai Jawan: मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाने विक्रोळीच्या टागोर नगर परिसरातील दहीहंडीला 9 थर रचून सलामी दिली.

Dahihandi 2024 Jai Jawan
1/10

मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाने विक्रोळीच्या टागोर नगर परिसरातील दहीहंडीला 9 थर रचून सलामी दिली. (Photo Credit-ABP Majha)
2/10

पहिल्याच प्रयत्नात जय जवान पथकाने 9 थर रचले.(Photo Credit-ABP Majha)
3/10

दहीहंडी उत्सव सर्वत्र जोरदार सुरू आहे. (Photo Credit-ABP Majha)
4/10

गोविंदा पथकही उंच उंच मनोरे रचण्यासाठी सर्वत्र पोहोचत आहेत. (Photo Credit-ABP Majha)
5/10

यामध्ये मुंबईतील जोगेश्वरी जय जवान पथक यंदा दहा थर लावण्याचा प्रयत्न असणार आहे. (Photo Credit-ABP Majha)
6/10

या जय जवान गोविंदांच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे, एकावर एक हवेत चार एके उचलणारे नितीन गिजे हे फार महत्वाची भूमिका बजावतात. (Photo Credit-ABP Majha)
7/10

दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. (Photo Credit-ABP Majha)
8/10

संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठ्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत. (Photo Credit-ABP Majha)
9/10

ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी. मोठ्या संख्येने गोविंदा पथक सलामी देण्यासाठी हजर आहेत. प्रथम बक्षीस - 25 लाखांचं आहे. (Photo Credit-ABP Majha)
10/10

दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात. या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज झाली आहेत. (Photo Credit-ABP Majha)
Published at : 27 Aug 2024 12:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
