एक्स्प्लोर
PHOTO: नवरी झाल्या दोन जुळ्या बहिणी, नवरदेव एकच; अकलुजमधील चर्चेत आलेल्या लग्नाचे भन्नाट फोटो पाहा...
solapur akluj marriage photo : एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
solapur akluj marriage photo
1/10

एका मांडवात एकाच वेळी दोन जुळ्या बहिणींसोबत पत्रिका छापून वाजत गाजत केलेले लग्न आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.
2/10

मूळचा महाळुंग परिसरातील अतुल आवताडे याने मुंबईच्या कांदिवली येथील रिंकी आणि पिंकी पाडगावकर या जुळ्या बहिणींसोबत लग्न केलं.
3/10

अनोख्या विवाहानंतर सोशल मीडियात यावर प्रतिक्रिया उमटू लागताच पोलिसांनी एकाच्या तक्रारींवर अदखलपात्र नोंद घेतली आहे.
4/10

समाजातील महिला वर्ग आक्रमक झाल्याने पोलिसांच्या समोरचा पेच देखील वाढत चालला आहे.
5/10

एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
6/10

शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय.
7/10

अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.
8/10

तर कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत.
9/10

सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने रुग्णालयात त्यांची काळजी घेतली होती.
10/10

यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला.
Published at : 04 Dec 2022 08:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
चंद्रपूर


















