एक्स्प्लोर
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
Eknath Shinde Resigns as CM : मुख्यमंत्री एकनाख शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचा कार्यकाळ आज संपतो आहे. अशात शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Eknath Shinde Resigns as CM Maharashtra
1/13

विधानसभेचा कार्यकाळ आज संपतो आहे, याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यासाठी एकनाथ शिंदेंसह महायुतीतील सर्व वरिष्ठ नेते राजभवनावर दाखल झाले होते.
2/13

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपावला.
3/13

तसंच महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
4/13

सध्या महायुतीतील तिन्ही पक्षांची इच्छा आहे की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असावा, त्यामुळे मुख्यमंत्री पद कोणाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
5/13

आता मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार हे निश्चित असल्याचं बोललं जात आहे, परंतु एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत.
6/13

एकनाथ शिंदे पुढे मोठा निर्णय घेणार की महायुतीसोबतच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
7/13

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहावे, ही अनेकांची इच्छा आहे. यासाठी शिवसेना पक्ष देखील जोर देत असून अनेक ठिकाणी पूजा अर्चा आणि होम हवन देखील केले गेले आहेत.
8/13

मात्र दिल्लीत काय निर्णय होतो, अमित शाह काय निर्णय घेत यावर सर्व चित्र अवलंबून आहे.
9/13

शिवसेनेच्या आमदारांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनाच बसवावं, यासाठी भाजपकडे मागणी केली गेली.
10/13

गेल्या अडीच वर्षात केलं गेलेलं काम पाहता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी योग्य असल्याचं शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचं मत आहे.
11/13

सुरुवातीचे किमान एक-दोन वर्ष तरी मुख्यमंत्री पद द्या, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत.
12/13

तोपर्यंत सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.
13/13

शिवाय महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.
Published at : 26 Nov 2024 11:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
