JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?
JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?
सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL) ने विविध उच्च पदांसाठी मंगळवारपासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. याबाबातची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत इंजिनीअर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि असिस्टंट जनरल मॅनेजर अशी एकूण 58 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 19 नोव्हेंबरपासून EIL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2024 आहे.
हे ही वाचा..
तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर मोठी संधी निर्माण झाली आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये (Union Bank of India) स्थानिक बँक अधिकारी पदाच्या 1500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार विहित शुल्क भरुन बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. आज म्हणजेच 13 नोव्हेंबर ही या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. जाणून घेऊन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया.
जर तुम्ही पदवी उत्तीर्ण केली असेल तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे. तुम्ही युनियन बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईट unionbankofindia.co.in ला भेट देऊन स्थानिक बँक अधिकाऱ्याच्या 1500 पदांसाठी अर्ज करू शकता. 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक देखील अर्ज करु शकत नाहीत. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, अर्जदाराचे किमान वय 1 ऑक्टोबर 2024 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. यासोबतच, भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.