लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
पुढील काळात काळात लॉजिस्टिक, ई-कॉमर्स आणि उत्पादन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या 7.1 टक्क्यांनी वाढू शकते, असे एका अहवालात म्हटले आहे
मुंबई : पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर तरुणाई नोकरीच्या शोधात वणवण करत असते. अनेकांना सरकारी नोकरीची (JOB) दारे खुणवत असतात, पण सरकारी नोकरीतील स्पर्धा, जागांची संख्या आणि बहुतांश खात्यात होत असलेली कंत्राटी भरती, यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राकडेच नवी तरुणाई वळताना दिसून येते. चालू आर्थक वर्षातील दुसऱ्या सहामाहीमध्ये तरुणांना रोजगारांच्या मुबलक संधी उपलब्ध होतील, असे दिसत आहे. या सहा महिन्यांमध्ये साधारणपणे 59 टक्के कंपन्यांनी आपली कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या दिशेने नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे, पुढील काही महिन्यात नव्याने नोकरी शोधणाऱ्यांना नामी संधी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मिळू शकते. त्यासाठी, तुमचा प्रोफाईल, रिज्युम आणि सर्वोतोपरी कागदपत्रे तरुणाईने जमा करुन ठेवायला हवी. लॉजिस्टीक (Logistic) अन् ईव्ही व पायाभूत क्षेत्रात ह्या नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.
पुढील काळात काळात लॉजिस्टिक, ई-कॉमर्स आणि उत्पादन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या 7.1 टक्क्यांनी वाढू शकते, असे एका अहवालात म्हटले आहे. टीमलीज सर्व्हिसेसने 'ऑक्टोबर 2024 ते मार्च 2025 साठी रोजगार स्थिती अहवाल' या शीर्षकाखाली एक अहवाल जारी केला आहे. यात कोणत्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, याचे विवेचन केले आहे. काही उद्योगांकडे मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने नोकऱ्यांची संख्या वाढणार असल्याचे दिसत आहे.
69% लाजिस्टीक क्षेत्रातील कंपन्या कर्मचारी संख्या वाढवण्याच्या विचारात आहेत. या कंपन्यांकडून 22% आपली सध्याची कर्मचारी संख्या कायम ठेवणार आहे, असे यात म्हटले आहे. टीमलीज सर्व्हिसेसकडून हा अहवाल दोन फेऱ्यांमध्ये केलेल्या पाहणीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. त्यासाठी 10 शहरांमधील 23 कंपन्यांच्या 1,307 कर्मचारी नियुक्ती एजन्सींकडून मते जाणून घेण्यात आली आहेत.
14.2% लॉजिस्टिक्स क्षेत्रात
12.1% ईव्ही व पायाभूत सुविधा
10.5% कृषी, रसायने
8.9% ई-कॉमर्स, आयटी स्टार्टअप
8.5% वाहन उद्योग
8.2% किरकोळ क्षेत्र
हेही वाचा
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार