Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
Heeramandi 2: 'हिरामंडी'चा दुसरा सीझन (Heeramandi Season 2) येणार की नाही? की, एकाच सीझनची सीरिज होती? या चर्चांमध्ये मनिषा कोइरालानं थेट दुसऱ्या सीझनच्या शुटिंगची तारीखच सांगितली.
Heeramandi 2: काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हिरामंडी' (Heeramandi) वेब सीरिज (Web Series) प्रचंड गाजली. मल्टीस्टारर वेब सीरिज (Multistarrer Web Series) प्रचंड गाजली. पहिला सीझन पाहिल्यानंतर चाहत्यांनी लगचेच दुसऱ्या सीझनबाबत चर्चा सुरू केलेल्या. तेव्हापासूनच 'हिरामंडी'चा दुसरा सीझन (Heeramandi Season 2) येणार की नाही? की, एकाच सीझनची सीरिज होती, यासारख्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता हिरामंडीमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या मनीषा कोईरालानं (Manisha Koirala) हिरामंडीच्या दुसऱ्या सीझनबाबत मोठी अपडेट दिली आहे.
'हिरामंडी'च्या दुसऱ्या सीझनची सुरुवात पुढच्या वर्षापासून सुरू होणार असल्याची माहिती मनीषा कोईरालानं दिली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मनीषा कोईराला हिरामंडी 2 बद्दल बोलताना म्हणाली की, "पुढच्या वर्षी त्याचं शूटिंग सुरू होईल. आम्ही सर्व परत येण्याची वाट पाहत आहोत." यादरम्यान मनीषाला जेव्हा विचारण्यात आलं की, हिरामंडीच्या यशानंतर तिला आणखी प्रोजेक्ट्सच्या ऑफर आल्या का? यावर मनीषा म्हणाली की, काही स्क्रिप्ट्सवर चर्चा सुरू आहे. मात्र, प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत आपण कोणतीही माहिती शेअर करणार नसल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे.
इंडस्ट्रीमधल्या प्रवासाबाबत काय म्हणाली मनिषा कोईराला?
यावेळी मनीषा कोईरालानं तिच्या इंडस्ट्रीमधील प्रवासाविषयी सांगितलं. ती म्हणाली की, 30 वर्षांपूर्वी लोकांचा असा विश्वास होता की, इंडस्ट्री उद्योग नकारात्मक आणि वाईट गोष्टींनी भरलेला आहे. ते म्हणाले की, त्यावेळी 'चांगल्या कुटुंबातील मुलींना' चित्रपटसृष्टीत स्थान मिळवणं खूप कठीण होतं. सौदागर आणि इतर काही चित्रपटांच्या यशानंतर तिच्या अभिनयावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांनी तिचं कौतुक करायला सुरुवात केली, असं ती म्हणाली.
हीरामंडीमध्ये झळकलेली मोठी स्टारकास्ट
हिरामंडी हा संजय लीला भन्साळी यांचा ओटीटीवरचा सर्वाच मोठा प्रोजेक्ट होता. या सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, शर्मीन सेगल, फरदीन खान, ताहा शाह बदुशाह, अध्यायन सुमन, शेखर सुमन आणि जेसन शाह असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :