एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?

देशाच्या पंतप्रधान पदापासून ते सर्वच पक्षातील राजकीय नेते अनेक वेळा घराणेशाही वरून एकमेकांवर टीका करतात.

मुंबई : विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये (Election) घराणेशाहीचा मुद्दा प्रकर्षणाने समोर येतो. सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाहीचा डंका वाजताना पाहायला मिळतो. काँग्रेस असो किंवा भाजप, राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना सर्वच राजकीय नेत्यांच्या वारसदार, पुढची पिढी, युवा नेते बनून राजकारणात एन्ट्री करते. जिल्हा परिषद, नगराध्यक्ष, आमदार, खासदार ही लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची आणि मोठी पदेही त्यांना जणू वारसा हक्काने मिळावीत, तशी मिळतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही हीच घराणेशाही प्रकर्षणाने दिसून आली. विशेष म्हणजे याबाबतीत सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, पण राज्यातील 288 मतदारसंघांपैकी, 237 मतदारसंघात घराणेशाहीतून पुढे आलेले उमेदवार उभे असल्याचं चित्र दिसून आलं. त्यामध्ये, सर्वाधिक उमेदवार हे भाजपने (BJP) दिले होते. पण, दोन राष्ट्रवादी एकत्र केल्यास घराणेशाहीतील सर्वाधिक उमेदवार हे पवारांच्या राष्ट्रवादीनेच उभे केल्याचं पाहायला मिळत आहे. 

महाराष्ट्राचं राजकारण पाहिल्यास, पवार, ठाकरे, थोरात, देशमुख, मुंडे, शिंदे, फडणवीस या बड्या नेत्यांनाही राजकीय वारसा किंवा त्यांचा वारसा पुढे नेणारे कुटुंबातील सदस्य असल्याचे दिसून येते. बारामतीमधील पवार कुटुंबात मोठा राजकीय वारसा असून तीन पिढ्यांपासून त्यांची घराणेशाही दिसून येते. त्याचप्रमाणे ठाकरे, मुंडे, देशमुख यांसह राज्यातील बहुतांश मतदारसंघात घराणेशाहीचा बोलबाला असल्याचे चित्र आहे. देशाच्या पंतप्रधान पदापासून ते सर्वच पक्षातील राजकीय नेते अनेक वेळा घराणेशाही वरून एकमेकांवर टीका करतात. निवडणुका म्हटल्या की घराणेशाही हा विषय नेहमीच समोर येतो. यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा 288 मतदारासंघांपैकी जवळपास 237 मतदारसंघात घराणेशाहीचा बोलबाला पाहायला मिळालं.  घराणेशाहीची पार्श्वभूमीवर असलेले उमेदवार येथील मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र, या 237 उमेदवारांपैकी केवल 89 उमेदवारांनाच जनतेनं निवडणून दिलं आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी याबाबतचा एक अहवाल समोर आणला आहे. घराणेशाही बाबतीत हेरंब कुलकर्णी यांनी आपला अहवाल सादर करताना याबाबतीत कायदेशीर नियमावली करण्याची मागणी सुद्धा केली आहे. हेरंब कुलकर्णी यांच्या अहवालानुसार, घराणेशाहीतील 237 उमेदवारांपैकी 89 उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपने तिकीट दिलेल्या उमेदवारांपैकी 32 टक्के उमेदवार हे घराणेशाहीशी निगडीत आहेत. 

विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीचे उमेदवार

काँग्रेस - 42
राष्ट्रवादी शप - 39
शिवसेना ठाकरे - 19
भाजप - 49
राष्ट्रवादी अप- 26 
शिवसेना शिंदे - 19
इतर - 43

लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीचे उमेदवार

विधानसभेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीतही घराणेशाही पाहायला मिळाली. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 36 जागांवर राजकीय घराणेशाहीतील उमेदवार उभे राहिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, घराणेशाही किती खोलपर्यंत पक्षात आणि जनतेतही रुजली आहे हे दिसून येते. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांचे हे धोरण असून मी नाही त्यात... असं कुणीही म्हणून शकणार नाही, असेच चित्र आहे. 

काँग्रेस - 7
राष्ट्रवादी शप- 3
शिवसेना ठाकरे - 6
भाजप - 14
राष्ट्रवादीअप - 1
शिवसेना - 5

हेही वाचा

रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 27 November 2024JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाDelhi Meeting On Maharashtra Cabinet:  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Pushpa 2 Third Part Hint : पार्ट 2 मध्येच संपणार 'पुष्पा'ची कहाणी? सेटवरुन काढलेला शुटिंगदरम्यानचा शेवटचा फोटो व्हायरल
पार्ट 2 मध्येच संपणार 'पुष्पा'ची कहाणी? सेटवरुन काढलेला शुटिंगदरम्यानचा शेवटचा फोटो व्हायरल
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
Embed widget