Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
Mohammed Siraj : 'बिग बॉस' फेम एका अभिनेत्रीच्या नजरेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मोहम्मद सिराजच्या चाहत्यांना त्याच्या प्रेमाची चाहूल लागली आहे.
Mohammed Siraj : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी क्रिकेट मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकला असून याचे श्रेय गोलंदाजांना जाते. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही भारताकडून खेळत असून त्याने जबरदस्त गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियन खेळाडूंची अवस्था बिकट केली. आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला मोहम्मद सिराज सध्या इतर कारणांमुळे चर्चेत आला आहे. 'बिग बॉस' फेम एका अभिनेत्रीच्या नजरेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मोहम्मद सिराजच्या चाहत्यांना त्याच्या प्रेमाची चाहूल लागली आहे.
मोहम्मद सिराजकडून माहिरा शर्माचा फोटो लाईक
'बिग बॉस' फेम अभिनेत्री माहिरा शर्माने काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो शेअर केले होते. मोहम्मद सिराजला माहीराे फोटो आवडले. यानंतर चाहत्यांना हिंट मिळाली की तो माहिरा शर्माच्या प्रेमात पडला आहे. असे म्हटले जाते की, मोहम्मद सिराजला कोणत्याही अभिनेत्रीचे फोटो लाईक करत नाही. त्यामुळेच या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. मात्र, माहिरा शर्मा आणि मोहम्मद सिराज यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता हे दोघे खरोखरच रिलेशनशिपमध्ये आहेत की केवळ अफवा आहे हे येणारा काळच सांगेल.
View this post on Instagram
माहिरा शर्माने पारस छाबरासोबत ब्रेकअप केले आहे
नुकत्याच झालेल्या IPL 2025 च्या लिलावात गुजरात टायटन्स संघाने 30 वर्षीय मोहम्मद सिराजला 12.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. माहिरा शर्माबद्दल सांगायचे तर तिने 25 नोव्हेंबरला तिचा 27 वा वाढदिवस साजरा केला. माहिरा शर्मा 'बिग बॉस 13' मध्ये दिसली होती आणि तिला या शोमध्ये खूप लोकप्रियता मिळाली. 'बिग बॉस 13' मधील तिचा सहकारी स्पर्धक पारस छाबरासोबत ती रिलेशनशिपमध्ये आली. काही दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. उल्लेखनीय आहे की माहिरा शर्माने टीव्ही आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या