राज्यातील वातावरणात (Weather) हळूहळू बदल होत आहे. थंडीची चाहूल लागली आहे.
2/9
उद्यापासून (17 नोव्हेंबरपासून) महाराष्ट्रातील काही भागात थंडी वाढणार आहे.
3/9
नाशिक, अहमदनगर, पुणे, नंदुरबार, जळगांव, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता
4/9
राज्यात हळूहळू थंडीची चाहूल लागण्याची शक्यता कायम असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली.
5/9
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसानंतर उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन पर्वतीय क्षेत्रात पुन्हा येऊ घातलेले नवीन पश्चिमी झंजावाताच्या परिणामातून पडणारा पाऊस आणि बर्फवृष्टीमुळं महाराष्ट्रात अधिक थंडी जाणवण्यासही मदत होईल
6/9
आज बंगालच्या उपसागरात सध्या अस्तित्वात असलेले अतितीव्र कमी दाब क्षेत्राचे उद्या (दि.17 नोव्हेंबरला) चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे
7/9
19 नोव्हेंबर ते बुधवार दिनांक 23 नोव्हेंबरच्या पाच दिवसादरम्यान महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली ह्या जिल्ह्यात वातावरण काहीसे ढगाळलेले राहणार आहे.
8/9
कमाल आणि किमान तापमानात काहींशी वाढ होवून वातावरणात ऊबदारपणा जाणवण्याची शक्यता खउळे यांनी व्यक्त केली आहे.
9/9
सध्याच्या वातावरणातील स्थितीनुसार, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आणि तामिळनाडू, केरळातील ईशान्य हिवाळी मान्सूनच्या गतिविधितेला चालना मिळत असल्याचे खुळे म्हणाले.