एक्स्प्लोर

राज ठाकरेंची रणनीती नेमकी काय? मनसेच्या 'राज'कारणात गुरफटली महायुती आणि महाविकास आघाडी!

Maharashtra Assembly Elections 2024: शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना भाजपनं समर्थन देण्यात आलं आहे. तर, दुसऱ्याबाजूला भाजपच्या हिंगणामधील उमेदवाराला मनसेकडून समर्थन देण्यात आलं आहे.

Maharashtra Assembly Elections 2024

1/10
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीनं समीकरणांची जुळवाजुळव केली असून निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. पण, महाराष्ट्रातील निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या रणनितीनं सर्वांना धक्का दिला आहे.

2/10
राज ठाकरेंचा पक्ष 288 पैकी 139 जागांवर निवडणुका लढवत आहे. पण, प्रश्न असा आहे की, महायुती आणि महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या लढाईत राज ठाकरेंची मनसे 139 पैकी किती जागा जिंकू शकेल? किती जागांवर डिपॉझिट जप्त होईल की, त्या-त्या मतदारसंघातील दुसऱ्या पक्षांचा खेळ बिघडवण्यात यशस्वी ठरणार?

3/10
यंदाच्या विधानसभेच्या रिंगणात राज ठाकरे कंबर कसून उतरले आहेत. वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडत आहे. पण, राज ठाकरेंच्या सभांमधील भाषणात एक गोष्ट प्रामुख्यानं पाहायला मिळत आहे, ती म्हणजे, राज ठाकरे आपल्या भाषणांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका करत आहेत. पण, भाजपचा साधा उल्लेखही करत नाहीत.

4/10
अशातच आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, राज ठाकरे भाजपवर सातत्यानं टीका करणं टाळत आहे, मात्र, भाजपसोबत महायुतीत असलेल्या शिंदेंवर मात्र जोरदार हल्ला चढवत आहेत. यामध्ये भाजप आणि मनसेचा काही गेमप्लान तर नाही ना?

5/10
महाराष्ट्रात भाजप, शिंदे आणि अजित पवारांचं महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्री पदाची माळ शिंदेंच्या गळ्यात आहे. असं असलं तरी, सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपला मात्र, याची काडीमात्र खंत नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत फक्त स्वतःचं सरकारच नाहीतर, स्वतःचा मुख्यमंत्रीसुद्धा निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

6/10
भाजपला केवळ सर्वात मोठा पक्ष बनून चालणार नाही, तर बहुमताच्या इतक्या जवळ यावं लागेल, ज्यामुळे ते कुणाच्याच दबावाखाली येणार नाही. त्यामुळेच भाजप 148 जागांवर निवडणूक लढवत आहे. येथे बहुमताचा आकडा 145 आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरेंनी काही जागा जिंकल्या तर भाजपवरील दबाव कमी होईल.

7/10
महाराष्ट्रातील मित्रपक्षांच्या जागा कमी करून मनसे आणि अपक्ष आमदारांची संख्या वाढल्याचा थेट फायदा भाजपला मिळणार आहे. असं असलं तरी राज ठाकरेंना ना भाजप सरकारची अडचण आहे, ना भाजपचा मुख्यमंत्री होण्याशी, असंच चित्र दिसतंय.

8/10
मुंबईतील 36 जागांवर भाजप आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्री दिसून येत आहे. विधानसभेच्या सात जागा अशा आहेत, जिथे राज ठाकरे यांनी भाजपविरोधात उमेदवार उभे केलेले नाहीत, तर त्यांचा सर्वाधिक प्रभाव फक्त मुंबईत आहे.

9/10
एवढंच नाहीतर भाजपकडून शिवसेनेतून निवडणूक लढवणाऱ्या शायना एनसी यांच्या विरोधातही राज ठाकरेंनी उमेदवार उभा केला नाही.

10/10
मुंबईच्या शिवडी विधानसभेच्या जागेवर महायुतीचा एकही उमेदवार नाही. इथून उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात मनसेचे बाळा नांदगावकर रिंगणात आहेत, तर भाजपनं हिंगणा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार समीर मेघे यांना तिकीट दिलं आहे. या विधानसभा जागेवर भाजपनं मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे.

निवडणूक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादेत धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादेत धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?

Pune winter: आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

KDMC Drama:शिवसेनेला सुरुंग,महायुतीत महाभूकंप;नाराजीनाट्यानंतर भेटीगाठी, तहाचं निशाण Special Report
Baramati NCP VS NCP : बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report
Anjali Damania On Ajit Pawar : अंजली दमानिया वाढवणार पवारांच्या अडचणी? राजीनाम्याची केली मागणी
Kalyan Dombivali News : भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा नाराजीनाट्य, मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी
Dhurla Nivadnukicha : Superfast News : 18 Nov 2025 : 5 PM : Maharashtra Superfast : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादेत धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादेत धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
Pune winter: आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी; पती-पत्नी, भाऊ-भावजय, मेव्हणा, भाचाही मैदानात

Ramesh Pardeshi: मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार

Embed widget