एक्स्प्लोर
हातातोंडाशी आलेलं उभं पीक वाहून गेलं, बीड जिल्ह्यात अतिवृष्टीनं खरिपाच्या पिकांचं मोठं नुकसान; बळीराज्याच्या डोळ्यात अश्रू!
Beed Rain News : बीड जिल्ह्यात नदी काठच्या गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक भागातील नदीकाठी असलेल्या शेतजमिनीसह खरिपाची पिकं अक्षरशः वाहून गेलीय.
Beed Rain News
1/8

Beed Rain News : बीड जिल्ह्यात नदी काठच्या गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक भागातील नदीकाठी असलेल्या शेतजमिनीसह खरिपाची पिकं अक्षरशः वाहून गेलीय.
2/8

शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगावात ही विदारक परिस्थिती निर्माण झालीय. किना नदीकाठी असलेल्या शेत जमिनी खरीपाच्या हंगामातील कापूस, तूर, उडीद यासह केळी सीताफळाच्या बागा नदीच्या पुरात वाहून गेल्यात.
3/8

या परिस्थितीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. दरम्यान आता हे शेतकरी सरकारच्या मदतीकडे आस लावून आहेत.
4/8

दुसरीकडे, परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण गावच्या संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे.
5/8

गावाला जोडणारा पूल हा लहान आणि अरुंद असल्याने या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे.ज्यामुळे गावकऱ्यांना गावाबाहेर जाता येत नसल्याने गावातच अडकून पडावे लागत आहे. सलग 8 दिवस गावकरी गावातच अडकून आहेत.
6/8

बीड मधील आष्टी, शिरूर कासार, परळी, अंबाजोगाई तालुक्यासह अन्य तालुक्यात मागील काही दिवसात ढगफुटी आणि अतिवृष्टी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसह जिवीत आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
7/8

यासह अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. याच सर्व नुकसानीचा आढावा मंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत प्रशासनाकडून घेणार आहेत.
8/8

गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने कहर केल्याचे चित्र आहे. सध्या जरी पावसाचा जोर कमी झाला असला तरी या अतिवृष्टीच्या नुकसानीची दाहकता आता समोर येत आहे. अशातच बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्री पंकजा मुंडे आज घेणार आहेत. यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीच्या आयोजन करण्यात आले आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्ह्यातील संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती या बैठकीला असणार आहे.
Published at : 21 Sep 2025 01:09 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
भारत
व्यापार-उद्योग


















