एक्स्प्लोर
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
Gold Price Rate in 2026 : 24 कॅरेट सोन्याचे दर 134000 रुपयांवर पोहोचल्यानंतर पुन्हा घसरले आहेत. तज्ज्ञांच्या मते 2026 सोन्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सोने दर
1/5

सोन्याच्या दरात सध्या जोरदार घसरण सुरु आहे. शुक्रवारी 24 कॅरेटच्या सोन्याच्या एका तोळ्याच्या दरात घसरण होऊन ते 120770 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा दर 149125 रुपयांवर पोहोचला आहे.
2/5

तज्ज्ञांच्या मते 2026 मध्ये सोन्याचा दर 156000 रुपयांवर पोहोचू शकतो. सध्याच्या काळात सोन्याच्या दरातील घसरण पाहता तज्ज्ञांच्या मते सोने खरेदीची चांगली संधी आहे.
3/5

सोन्याचा एका तोळ्याचा दर 17 ऑक्टोबरला 130874 रुपयांवर पोहोचला होता. तेव्हापासून 31 ऑक्टोबरपर्यंत सोन्याचा दर 10104 रुपयांनी कमी झाला आहे. चांदीच्या दरात 28975 रुपयांची घसरण झाली आहे.
4/5

पुढील वर्षी सोन्याचे दर वाढू शकतात अशी शक्यता आहे. याचं कारण जगातील विविध देशातील केंद्रीय बँकांकडून सुरु असलेली सोने खरेदी आणि अमेरिकन फेड रिझर्व्हच्या संभाव्य व्याज दरातील कपातीचा यावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. सोन्याच्या दरांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते 2026 मध्ये दर 126000 ते 156000 रुपयांदरम्यान असू शकतात.
5/5

ब्रोकरेज हाऊस एचएसबीसीच्या अपेक्षेनुसार सोन्याचा एका तोळ्याचा दर 144068 रुपयांपर्यंत असू शकतो. गोल्डमन सॅचच्या अंदाजानुसार सोन्याचा दर 153000 रुपयांदरम्यान असू शकतो. इकोनॉमिक्स टाईम्सच्या रिपोर्टनुसार जेपी मॉर्गन गोल्डचे दर पुढील वर्षी 125000 रुपयांमध्ये असू शकतात.
Published at : 02 Nov 2025 08:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























