एक्स्प्लोर

Trump Tariff : ट्रम्प टॅरिफचा परिणाम दिसू लागला, चार महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?

Trump Tariff Impact: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यानं भारताच्या निर्यातीला फटका बसला आहे. 

नवी दिल्ली :  अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करारासंदर्भत चर्चा सुरु आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. त्याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर दिसून आला आहे. अमेरिकेला होणारी भारताची निर्यात कमी होत आहे.  मे ते सप्टेंबर 2025 या कालावधीत भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 37. 5 टक्क्यांनी घसरली आहे. निर्यात 8.8 अब्ज डॉलर्सच्या घसरणीवरुन 5.5 अब्ज डॉलर्सवर आली आहे. ही अलीकडच्या वर्षातील मोठी घसरण आहे. 

अमेरिकेनं टॅरिफ वाढवल्याचा परिणाम

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेनं 4.5  भारतावर 10 टक्के टॅरिफ लादलं होतं. ऑगस्ट महिन्यापर्यंत ते 50 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं आहे. त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं आहे.   

टॅरिफचा कोणत्या क्षेत्रावर परिणाम?

टेक्सटाइल, जेम्स-अँड-ज्वैलरी, केमिकल, कृषी उत्पादन आणि मशीनरी या सारख्या श्रम केंद्रीत क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. या क्षेत्राचं निर्यातीतून होणारं उत्पन्न  4.8 बिलियन डॉलरवरुन कमी होऊन 3.2 बिलियन डॉलर राहिलं आहे. म्हणजेच 33 टक्के घसरण झाली आहे. टॅरिफ फ्री उत्पादनांवर आयात शुल्क लादलं जात नाही त्याची निर्यात देखील घटलं आहे.  या उत्पादनांची निर्यात 3.4   बिलियन डॉलर्सवरुन घटून 1.8 बिलियन डॉलर्सवर आली आहे म्हणजेच 47 टक्क्यांनी घसरली आहे. स्मार्टफोन आणि औषधांची निर्यात सर्वाधिक प्रभावित झाली आहे. 

स्मार्टफोन निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 58 टक्के घसरण झाली आहे. जून महिन्यात 2 बिलियन डॉलरची निर्यात होती जी  सप्टेंबरमध्ये 884.6 मिलियन डॉलर्सवर आली आहे.  औषध क्षेत्रातील निर्यात 15.7 टक्क्यांनी घटली आहे. इंडस्ट्रियल मेटल आणि ऑटो पार्टसच्या निर्यात घसरण झाली. या क्षेत्रात 16.7 टक्के घसरण झाली. एल्युमिनियममध्ये 37 टक्के, कॉपरमध्ये 25 टक्के, ऑटो पार्ट्समध्ये 12टक्के आणि आयरन-स्टीलमध्ये 8 टक्के घसरण झाली.  

अमेरिकन बाजारात भारताची जागा कोण घेतंय?

जेम्स आणि ज्वेलरीची निर्यात 500.2 मिलियन डॉलरवरुन घटून 202 डॉलरवर आली आहे. म्हणजेच 59.5 टक्के घसरण झाली आहे. सूरत आणि मुंबईच्या यूनिटसवर त्याचा परिणाम झाली आहे.  अमेरिकन  बाजारात भारताची जागा थायलँड आणि व्हिएतनामनं घेतली आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं असून चीनवर 30 टक्के तर व्हिएतनामवर 20 टक्के टॅरिफ लादलं आहे.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Mutual Fund Update : सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0; ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटी रुपयांचा रेट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0; ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटी रुपयांचा रेट
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
Embed widget