Leopard Attack : नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
Leopard Attack Pune News : गेल्या दहा दिवसात पिंपरखेड परिसरात तीन जणांचा जीव बिबट्याने घेतला आहे. त्यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.

पुणे: जिल्ह्यातील जांबूत आणि पिंपरखेड परिसरातील वाढत्या मानव-बिबट संघर्षामुळे जनतेत भीतीचं वातावरण पसरलं आहे. नुकत्याच घडलेल्या हृदयद्रावक घटनेनंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात यावं (shoot order for man eater leopard) अशी ठाम मागणी त्यांनी केली. त्या संबंधी त्यांनी वनविभागाला पत्र लिहिलं आहे.
Letter to Forest Department : मुख्य वनसंरक्षकांना पत्र
खासदार कोल्हे यांनी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे (Ashish Thakare) यांना पत्र पाठवून, चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन (Chief Wildlife Warden) आणि राज्य सरकारकडे तातडीने एलिमिनेशन ऑर्डर (Elimination Order) मिळविण्यासाठी पावले उचलावीत, असे म्हटले आहे.
बिबट्याचा वावर आसपासच असल्यामुळे तो आणखी काही माणसांवर हल्ले करु शकतो अशी भीती आहे. या परिस्थितीत नरभक्षक बिबट्याची ओळख पटवून त्यास ठार मारणे अत्यंत आवश्यक आहे असं अमोल कोल्हे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात बिबट्यांचे मनुष्यावरील हल्ले सातत्याने वाढत आहेत. गेल्या दीट महिन्यात हे संकट अधिकच तीव्र झाले असून बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये या काळात चार निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. याखेरीज गेल्या काही दिवसांत वनविभागाने 7 बिबट्यांना जेरबंद केले आहे. पण सातत्याने… pic.twitter.com/93Ui8OkWKG
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) November 2, 2025
Leopard Attack in Pimpalkhed : 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; नागरिकांचा संताप
शनिवारी, 1 नोव्हेंबर रोजी पिंपरखेड येथे 10 वर्षांच्या रोहन विलास बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वनविभागाचे वाहन आणि कार्यालय पेटवून दिले. गेल्या 10 दिवसांत 2 लहानग्यांचा आणि महिनाभरात एकूण 3 जणांचा बिबट हल्ल्यांत जीव गेला आहे.
Leopard Attack Pune News : नागरिक भयभीत
खासदार कोल्हे यांनी म्हटलं आहे की, “भरदिवसा माता-भगिनी आणि लहान मुलं बिबट्यांच्या तावडीत सापडत असताना, राज्य सरकार हातावर हात धरून बसलं आहे असा आरोप केला जात आहे. प्रशासनाची ही निष्क्रियता संतापजनक आहे अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. आता एकही क्षण न दवडता लोकांच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेचा संताप अधिक वाढेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Demand for Immediate Action : तत्काळ निर्णयाची मागणी
खासदार कोल्हे यांनी वनविभागाकडे मागणी केली आहे की, या भागातील नरभक्षक बिबट्यांना ठार करण्यासाठी तातडीने एलिमिनेशन ऑर्डर काढण्यात यावी. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मानव-बिबट संघर्ष नियंत्रण योजना प्रभावीपणे राबवावी.


















