एक्स्प्लोर
Baba Vanga Predictions Aliens : बाबा वेंगाची भविष्यवाणी! एलियन्सबद्दल केला 'असा' खुलासा; 2026 साठीही दिले 'हे' संकेत
Baba Vanga Predictions Aliens : बाबा वेंगा यांनी 2026 साठी वाढत्या सोन्याच्या किंमती, गृह, युद्ध, आर्थिक तंगी, संकट आणि एलियंसशी संबंधित इशारा दिला आहे.
Baba Vanga Predictions
1/6

2025 चा नोव्हेंबरचा महिना सध्या सुरु आहे. जसजसं नवीन वर्ष 2026 जवळ येतंय तसतसं बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीची चर्चा होते. बाबा वेंगा यांनी 2026 साठी वाढत्या सोन्याच्या किंमती, गृह, युद्ध, आर्थिक तंगी, संकट आणि एलियंसशी संबंधित इशारा दिला आहे. आता नासामधून अशी एक बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
2/6

आपल्या आकाशगंगेतील एक रहस्यमय अंतराळयान गेल्या काही महिन्यांपासून शास्त्रज्ञांना गोंधळात टाकत आहे. शास्त्रज्ञांनी या आंतरतारकीय वस्तूला 3I/ATLAS असे नाव दिले आहे. हार्वर्ड विद्यापीठातील खगोल भौतिकशास्त्रज्ञांनी एक आश्चर्यकारक दावा केला आहे की हे एखादं पिंड नाही तर तो परग्रही तंत्रज्ञानाशी संबंधित अंतराळयान असू शकतो.
3/6

शास्त्रज्ञांना त्यांच्या तपासणीत असे आढळून आले की, अवकाशात दिसणारी ही वस्तू मॅनहॅटनच्या आकाराची आहे. ज्याचे वजन अंदाजे 33 अब्ज टन आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ते Nickel tetracarbonyl सोडत आहे. जे यापूर्वी कोणत्याही धूमकेतूमध्ये दिसले नाही.
4/6

धूमकेतू सामान्यतः त्यांच्या मागे प्रकाश प्रक्षेपित करतात, जो शेपटीसारखा दिसतो. रहस्यमय अंतराळयान 3I/ATLAS प्रकाश पुढे प्रक्षेपित करतो, जणू काही तो समोरून येणारा प्रकाश आहे.
5/6

19 डिसेंबर रोजी 3I/ATLAS पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. नासाने अहवाल दिला आहे की तो पृथ्वीपासून किमान 240 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असल्याने पृथ्वीला कोणताही धोका नाही. या घटनेनंतर, लोक याचा संबंध बाबा वेंगाच्या एलियन्सबद्दलच्या भाकिताशी जोडत आहेत.
6/6

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 02 Nov 2025 01:22 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















