एक्स्प्लोर
India Wins Womens World Cup 2025 Harmanpreet Kaur च्या Team India ने रचला इतिहास;विश्वचषकावर नाव
भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदाच वनडे विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या ऐतिहासिक विजयाची शिल्पकार कर्णधार हरमनप्रीत कौर ठरली. एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली, 'जी रोहित शर्माची जखम होती ती आज शेफाली वर्माने भरून काढलेली आहे'. गेली १७ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या हरमनप्रीत कौर आणि टीम इंडियाने करोडो भारतीयांचे स्वप्न पूर्ण केले आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांना पराभूत केले, ज्यांनी साखळी फेरीत भारताला हरवले होते. बीसीसीआयने मानधन पुरुषांच्या बरोबरीने करूनही मोठी स्पर्धा जिंकता येत नसल्याची टीका होत होती, पण या विजयाने सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















