एक्स्प्लोर
Koyta Gang: कल्याणमध्ये मध्यरात्री पुन्हा 'कोयता गँग'चा थरार, मद्यधुंद तरुणांचा रस्त्यावर धिंगाणा
कल्याणमध्ये (Kalyan) मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत तरुणांनी कोयता (Koyta) घेऊन दहशत माजवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘मद्यधुंद अवस्थेमध्ये दहशत माजवणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे,’ या घटनेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या तरुणांनी घातलेल्या धिंगाण्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कल्याणमध्ये गेल्या काही दिवसांपासून अशा गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















