एक्स्प्लोर
Aadhaar card: नवजात मुलांचे Baal Aadhaar Card बनवायचंय? ही कागदपत्रे आहेत जरुरी!
आधार कार्ड हे भारतातील आजच्या युगातील एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. ५ वर्षांखालील मुलांसाठी आधार कार्ड कसे बनवता येईल ते जाणून घेऊया.

आधार कार्ड
1/10

भारतात आधार कार्डची गरज लक्षात घेऊन, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) नवजात मुलांसाठी देखील आधार कार्ड जारी करते.
2/10

आधार कार्डाशिवाय मुलांना अनेक शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागू शकते.
3/10

भारत सरकार ५ वर्षांखालील मुलांना निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड जारी करते.
4/10

देशातील अनेक रुग्णालयांमध्ये ही सुविधा आधीपासूनच आहे, जेव्हा मुले जन्माला येतात, तेव्हाच त्याचे आधार कार्ड बनवले जाते.
5/10

जर तुमच्या मुलाचे आधार कार्ड बनवायचे राहिले असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्रात किंवा अंगणवाडीत जाऊन मुलाचे कार्ड बनवू शकता.
6/10

तुम्ही तिथे जाऊन आधारसाठी ऑनलाइन अर्जही करू शकता. मुलासाठी आधार तयार करण्यासाठी तुम्हाला नावनोंदणी फॉर्म भरावा लागेल. यासह काही कागदपत्रे आवश्यक असतील.
7/10

UIDAI 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड जारी करते. हे कार्ड पाच वर्षांसाठी वैध आहे. त्यानंतर ते अपडेट करावे लागेल.
8/10

आधार कार्ड मुळात एखाद्या व्यक्तीचे बायो-मेट्रिक्स (फिंगरप्रिंट) आणि बुबुळ (रेटिना स्कॅन) स्कॅन करून 12 अंकी ओळख क्रमांक प्रदान करते परंतु नवजात मुलाचे किंवा 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे बोटांचे ठसे आणि बुबुळ पूर्णपणे विकसित झालेले नसतात. म्हणून UIDAI ने मुलांसाठी चाइल्ड आधार कार्ड ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
9/10

यासाठी, तुम्हाला मुलाचे जन्म प्रमाणपत्र किंवा मान्यताप्राप्त शाळा ओळखपत्र किंवा फोटो ओळखपत्र आवश्यक आहे.
10/10

परंतु ते नसल्यास, पालकांपैकी एकाचे आधार कार्ड आवश्यक असेल. (सर्व फूट सौजन्य : गुगल)
Published at : 18 Oct 2022 01:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
