एक्स्प्लोर
Shrikant Shinde : मुख्यमंत्री पुत्र लागले निवडणुकीच्या तयारीला, पाहा फोटो
Shrikant Shinde in Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) देखील आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
Shrikant Shinde in Aurangabad
1/9

पक्षवाढीसाठी श्रीकांत यांनी आता दौरे सुरु केले असून, त्यांनी रविवारी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचा दौरा केला आहे.
2/9

यावेळी श्रीकांत शिंदे यांनी औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यातील शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, निरीक्षक, संपर्कप्रमुख, महिला आघाडी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.
3/9

या सर्व जिल्ह्यांमध्ये पक्षाचे काम कशा पद्धतीने सुरु आहे, पक्षबळकटी करणासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविणे याविषयी आढावा घेण्यासाठी रविवारी औरंगाबाद येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
4/9

या मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
5/9

प्रत्येक संघटना मोठी करण्याचे आणि तळागाळात पोहोचवण्याचे काम हे त्या संघटनेसाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते करत असतात, असे शिंदे म्हणाले.
6/9

दरम्यान पक्षाच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांशी वेळोवेळी संवाद साधायला हवा, असे आवाहन यावेळी उपस्थित असलेल्या सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी केले.
7/9

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये शिवसेना शाखा संपर्क अभियान राबवण्यात येत आहे.
8/9

शाखा संपर्क अभियानच्या माध्यमातून पक्षासाठी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहचण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.
9/9

सर्वांनी शाखांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न कसे सोडवता येतील यावर भर द्यायला हवा. यातून नागरिकांच्या समस्या ही मार्गी लागणार आहेत तर आपल्या सर्वांचा यामुळे जनसंपर्कही वाढणार असल्याचे यावेळी शिंदे म्हणाले.
Published at : 07 Aug 2023 12:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























