एक्स्प्लोर

Pune Navale Bridge Accident : पुणे नवले पुलावरचा अपघात नेमका कसा घडला? पोलीस अधिकारी म्हणाले...

पुणे शहरातील (Pune) नवले पुलावर झालेल्या अपघातात (Accident) मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून व्हिडिओ पाहिल्यानंतर अपघाताची दाहकता लक्षात येते. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढल्याचं अग्निशमन दलाने सांगितलं आहे. मात्र, आणखी काहीजण आग लागलेल्या वाहनांमध्ये अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, मृतांचा आकडा वाढू शकतो. दरम्यान, घटनास्थळावरुन पोलीस अधिकाऱ्यांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 20 जण जखमी असल्याची माहिती आहे.

पुण्यातील रहदारीच्या आणि प्रसिद्ध अशा नवले ब्रीजवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन-तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी मोठी आग लागली होती. या आगीत एका ट्रकने पेट घेतला. अपघातानंतर कंटनेरच्या मध्ये कार अडकली असून क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढली जात आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती घटनास्थळावरुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार 6 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते तर, अनेकजण जखमी आहेत. त्यामध्ये, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

अपघात नेमका कसा घडला? (Pune navale bridge accident)

प्राथमिक माहितीनुसार, राजस्थान पासिंगचा लोडेड ट्रक साताऱ्याकडे मुंबईच्या दिशेने चालला होता. मात्र, नवले ब्रीजवरील सेल्फी पाँईटवर कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असावा, कारण त्याच्या ब्रेक फेलचे निशाण रस्त्यावर दिसून येत आहे. ब्रेक फेल झाल्याने ह्या ट्रकने इतरही वाहनांना धडक दिली, तसेच ट्रकने पुढे जाऊन कंटनेरला धडक दिली. मात्र, त्या कंटनेरच्या अलिकडे असलेली कार ट्रक आणि कंटेनरमध्ये अडकल्याची माहिती घटनास्थळावरुन पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या धडकेत कारने पेट घेतल्यानंतर ट्रकलाही आग लागली आहे. ब्रेक फेल झालेल्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाल्याचे समजते, सध्या अडकलेले लोक आणि वाहनांना बाहेर काढणे हे आमचे प्राथमिक काम आहे, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पुणे व्हिडीओ

Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
Embed widget