एक्स्प्लोर
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले, तब्बल 1 लाख क्युसेकने विसर्ग, गोदावरीला मोठा पूर
Jayakwadi Dam: मुसळधार पावसाने जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.
Jayakwadi Dam
1/10

जायकवाडी धरण क्षेत्रात शनिवारी दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली.
2/10

पैठण तालुक्यात देखील जोरदार झाला आहे.
3/10

यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
4/10

या वर्षात पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले आहेत.
5/10

जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार 184 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
6/10

जायकवाडीचे 9 आपत्कालीन दरवाजे देखील उघडले आहेत.
7/10

यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आल्याचे चित्र आहे.
8/10

गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
9/10

ठणच्या ग्रामीण भागातील जायकवाडी, पिंपळवाडी, राहूलनगर या भागातील अनेक घरात पाणी शिरले आहे.
10/10

तर शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Published at : 14 Sep 2025 09:31 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























