एक्स्प्लोर
Sangamner Accident News: संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी घाटात शालेय बसचा भीषण अपघात; विद्यार्थ्यांसह बस थेट खड्ड्यात कोसळली
Sangamner Accident : अहिल्यानगरच्या चंदनापुरीतुन अपघाताची मोठी बातमी आली आहे. यात शालेय बसचा भीषण अपघात झाला आहे.सध्या जखमी विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल केलं असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे...
Sangamner Accident News
1/6

अहिल्यानगरच्या चंदनापुरीतुन अपघाताची मोठी बातमी आली आहे. यात शालेय बसचा भीषण अपघात झाला आहे.
2/6

पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात झाला असून संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी घाटातील ही घटना घडली आहे.
3/6

विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणा-या बसला हा अपघात झाला आहे. यात महामार्गाच्या बाजूला खड्यात बस कोसळली आहे.
4/6

यात पाच ते सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.
5/6

महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. यात वाहनाने बसला हुल दिल्याने बस बाजूच्या खड्ड्यात कोसळली.
6/6

सध्या जखमी विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल केलं असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.
Published at : 04 Jul 2025 12:19 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























