एक्स्प्लोर
Chhattrapati Sambhajinagar Crime: 'तासाभरात येतो', रविवारी पत्नीला फोन, सोमवारी पुलाखाली आढळला मृतदेह, गाडीही फुटलेली, संभाजीनगरच्या उद्योजकासोबत नेमकं काय घडलं?
Chhattrapati Sambhajinagar Crime: रविवारी ते पत्नीला तासाभरात येतो म्हणाले होते. पण सोमवारी त्यांचा मृतदेह सापडला. हा अपघात आहे की घातपात, हे अजून स्पष्ट नाही.
Chhattrapati Sambhajinagar Crime
1/7

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करोडी टोलनाक्याजवळ एका पुलाखाली 37 वर्षीय उद्योजकाचा मृतदेह सापडला आहे. सागर परळकर असं त्या उद्योजकाचं नाव आहे.
2/7

सागर परळकर मूळचे पैठणचे होते आणि कांचनवाडीत राहत होते. रविवारी ते पत्नीला तासाभरात येतो म्हणाले होते. पण सोमवारी त्यांचा मृतदेह सापडला. हा अपघात आहे की घातपात, हे अजून स्पष्ट नाही.
3/7

सागर रामभाऊ परळकर वाळूज MIDC मध्ये पार्टनरशिपमध्ये पुष्पक ऍग्रो कंपनीत संचालक होते. मूळचे पैठण येथील असलेले सागर परळकर हे त्यांच्या आई, पत्नी आणि दोन मुलांसोबत कांचनवाडीत राहायचे.
4/7

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते रविवारी दुचाकीवरून कन्नडला गेले होते. रात्री 9 च्या सुमारास त्यांनी पत्नीला फोन केला. "मी तासाभरात येतो," असं ते पत्नीला म्हणाले होते. परिसरात या घटनेनंतर खळबळ उडाली. मात्र, हा अपघात आहे की घातपात आहे, याचा तपास पोलिस करत आहेत, त्याचबरोबर परिसरात देखील याबाबतची चर्चा रंगली आहे.
5/7

सोमवारी सायंकाळी करोडी टोल नाक्याजवळ पुलाखाली मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळील मोबाइल व आधार कार्डवरून सागर यांची ओळख पटली. तेथेच त्यांची दुचाकी तुटलेली सापडली. कुटुंबियांना कळवून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत पाठवण्यात आला.
6/7

रविवारी दुपारी ते कंपनीच्या कामासाठी दुचाकीने कन्नडला गेले होते. रात्री 9 वाजता त्यांचा पत्नीसोबत शेवटचा संपर्क झाला. त्यावेळी त्यांनी 'मी हतनूरजवळ आहे. तासाभरात येतो', असे सांगितले.
7/7

मात्र, त्यानंतर कुटुंबाचा त्यांच्याशी संपर्कच झाला नाही. मध्यरात्रीतून हवालदिल झालेल्या सागर यांच्या कुटुंबीयांनी, मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला. सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह करोडी टोलनाक्यानजीक पुलाखाली आढळून आला.
Published at : 22 Jul 2025 02:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























