एक्स्प्लोर

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील रहदारीच्या आणि प्रसिद्ध अशा नवले ब्रीजवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन-तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी मोठी आग लागली होती.

पुणे : शहरातील (Pune) नवले पुलावर झालेल्या अपघातात (Accident) मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून व्हिडिओ पाहिल्यानंतर अपघाताची दाहकता लक्षात येते. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढल्याचं अग्निशमन दलाने सांगितलं आहे. मात्र, आणखी काहीजण आग लागलेल्या वाहनांमध्ये अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, मृतांचा आकडा वाढू शकतो. दरम्यान, घटनास्थळावरुन पोलीस अधिकाऱ्यांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 20 जण जखमी असल्याची माहिती आहे.

पुण्यातील रहदारीच्या आणि प्रसिद्ध अशा नवले ब्रीजवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन-तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी मोठी आग लागली होती. या आगीत एका ट्रकने पेट घेतला. अपघातानंतर कंटनेरच्या मध्ये कार अडकली असून क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढली जात आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती घटनास्थळावरुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार 6 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते तर, अनेकजण जखमी आहेत. त्यामध्ये, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

अपघात नेमका कसा घडला? (Pune navale bridge accident)

प्राथमिक माहितीनुसार, राजस्थान पासिंगचा लोडेड ट्रक साताऱ्याकडे मुंबईच्या दिशेने चालला होता. मात्र, नवले ब्रीजवरील सेल्फी पाँईटवर कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असावा, कारण त्याच्या ब्रेक फेलचे निशाण रस्त्यावर दिसून येत आहे. ब्रेक फेल झाल्याने ह्या ट्रकने इतरही वाहनांना धडक दिली, तसेच ट्रकने पुढे जाऊन कंटनेरला धडक दिली. मात्र, त्या कंटनेरच्या अलिकडे असलेली कार ट्रक आणि कंटेनरमध्ये अडकल्याची माहिती घटनास्थळावरुन पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या धडकेत कारने पेट घेतल्यानंतर ट्रकलाही आग लागली आहे. ब्रेक फेल झालेल्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाल्याचे समजते, सध्या अडकलेले लोक आणि वाहनांना बाहेर काढणे हे आमचे प्राथमिक काम आहे, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अपघात घडण्याचे कारण काय? (Reason behind Pune accident)

नवले पूलावर झालेला हा काही पहिला अपघात नाही, याआधीदेखील असे अपघात या ठिकाणी झाले आहेत. महामार्गाची चुकलेली रचना अपघातांचे मुख्य कारण असून साताऱ्याहून पुण्याला येताना कात्रज बोगद्यानंतर महामार्गाला तीव्र उतार आहे. याच ठिकाणी महामार्गावर धोकादायक वळण आहे, तसेच या ठिकाणीच दोन्ही बाजुंनी सर्व्हिस रोड महामार्गाला येऊन मिळतात. तेव्हा तीव्र उतार असल्याने अनेकदा अवजड वाहनांचं नियंत्रण सुटतं, समोरच्या वाहनांवर ती अवजड वाहनं जाऊन धडकतात आणि अपघात घडतो. अपघातानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात, मात्र कोणताही कायमस्वरुपी तोडगा नाही, ही खेदाची बाब आहे. दरम्यान, एरवी लोकप्रतिनिधींचे भत्तेवाढ किंवा शासकीय निवासस्थानांच्या डागडुजीसाठी निधीबाबत एकमत होणाऱ्या लोकप्रतिनिधींनी लोकांचे जीव घेणाऱ्या या पुलावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी एकमताने पावलं टाकावीत, अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
Pune BJP Congress Rada: जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
फॉरेस्ट ऑफिसर नाहीत, नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे जंगल पोखरली जात आहेत; वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या खात्यातील कारभाराची कुंडलीच मांडली
फॉरेस्ट ऑफिसर नाहीत, नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे जंगल पोखरली जात आहेत; वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या खात्यातील कारभाराची कुंडलीच मांडली
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी

व्हिडीओ

Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस
Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर
Sanjay Raut PC : भाजपला काम-धंदा नाही, हिंदू-मुस्लीम दंगे भडकवतंय, राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद
Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
Pune BJP Congress Rada: जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
फॉरेस्ट ऑफिसर नाहीत, नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे जंगल पोखरली जात आहेत; वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या खात्यातील कारभाराची कुंडलीच मांडली
फॉरेस्ट ऑफिसर नाहीत, नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे जंगल पोखरली जात आहेत; वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या खात्यातील कारभाराची कुंडलीच मांडली
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
Abdul Sattar at Shiv Mandir: अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
Sanjay Raut on Ganesh Naik: गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
गणेश नाईक म्हणाले, 'तर एकनाथ शिंदेंना एक दिवस तुरुंगात जावं लागेल', आता विजय तुमचाच होईल म्हणत संजय राऊतांनी नाईकांना थेट ऑफर दिली! नेमकं काय म्हणाले?
Tamilnadu Election: निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
निवडणूक अगदी तोंडावर अन् तमिळनाडूत 1.3 कोटी महिलांच्या खात्यात अॅडव्हान्स 5 हजार जमा करून मग जाहीर केलं! महाराष्ट्र, बिहारनंतर आता तमिळनाडू सुद्धा त्याच मार्गावर
Narhari Zirwal Bribe case: मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
मंत्रालय लाचप्रकरणात महत्त्वाची अपडेट, राजेंद्र ढेरिंगेच्या घरी एसीबीची धाड, इकडे नरहरी झिरवळांच्या हालचालींना वेग
Embed widget