Pune Accident : साडे पाचची वेळ, भरधाव ट्रकची धडक मोठा आवाज, कारमधून मदतीसाठी हाक अन् आगीचे लोट, प्रत्यक्षदर्शीनं काय म्हटलं?
Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर झालेल्या ट्रकच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शीनं या अपघाताची माहिती दिली.

Pune Navale Bridge Accident पुणे: पुणे बंगळुरु महामार्गावरील नवले पूल हा अपघाताचा हॉट स्पॉट बनत आहे. पुण्यातील याच नवले ब्रीजवर आज सायंकाळी साडे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला.या अपघातात आतापर्यंतच्या माहितीनुसार 8 जणांचा मृत्यू झाला आहे. साताराहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक पेटल्यानं मृतांची संख्या वाढली, अपघाताची मिळताच अग्निशमन दलाचे जवान इथं दाखल झाले आहेत. या अपघातामुळं साताऱ्याहून मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. या अपघातात एका ट्रकचा चालक त्यात अडकून पडला होता. त्यासाठी अग्निशमन दलानं कटर मागवलं होतं. दोन मोठे ट्र्क आणि दोन कारचा अपघात झाला. हा अपघात कशामुळं याची झाला याची माहिती प्रत्यक्षदर्शीनं दिली आहे.
Pune Navale Bridge Accident : अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीनं काय सांगितलं?
नवले पूल भागात राहणाऱ्या व्यक्तीनं 5 वाजून 35 मिनिटांनी भरधाव वेगानं एक ट्रक आला. एक ट्रक आला त्यानं बऱ्याच वाहनांना मागून ठोकलं होतं. तो ट्रक एका वाहनाला धडकून थांबला होता. त्यानंतर मागून आलेल्या आणखी एका ट्र्कनं त्याला धडक दिली. त्यामुळं ट्रकनं पुढच्या वाहनांना पुन्हा धडक दिली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी लौकिक गोळे दिली. कारमधून एका व्यक्ती वाचवण्यासाठी आवाज देत होता, त्याच्या जवळ जाईपर्यंत डिझेलचा टँक फुटला आणि आग लागली, असं या प्रत्यक्षदर्शीनं म्हटलं.
प्रत्यक्षदर्शीनं ट्रकनं 10 ते 15 वाहनांना धडक दिल्याची माहिती दिली. त्या ट्रकनं एका कारला फरफटत आणलं होतं, असंही प्रत्यक्षदर्शीनं म्हटलं.
नवले पुलावरील या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, 20 ते 25 जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनातील एका कारमध्ये बाळ होतं, त्याचा देखील मृत्यू झाला आहे. या अपघातात ती कार पूर्ण चेपल्याचं दिसून आलं आणि कार जळून खाक झाली.
साताऱ्याहून मुंबईच्या दिशेनं जाणारा मालानं भरलेला ट्रक निघाला होता. नवले पुलावर या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं, या घटनेत 8 जणांचा मृ्त्यू झाला. रस्ता मोकळा करण्यासाठी क्रेन पोलीस प्रशासनाकडून आणण्यात आल्या आहेत. अपघातानंतर स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून मदतकार्य करण्यात येत आहे.
अपघात नेमका झाला कसा?
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ते 25 वाहनांचं नुकसान झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार राजस्थान पासिंगचा मालानं भरलेला ट्रक साताऱ्याकडून मुंबईकडे निघाला होता. नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ त्याचा ब्रेक फेल झाला असावा. स्कीड मार्कस आहेत. ब्रेक फेल झाल्यानं मध्ये जी वाहनं होती त्यांना धडकत पुढं गेला. पुढं असलेल्या कंटेनरला तो ट्रक धडकला. यामध्ये दोन कार होत्या, त्यापैकी एका कारचा स्फोट झाला आणि आग लागली, असं पोलीस अधिकाऱ्यानं म्हटलं.























