एक्स्प्लोर

पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट

पुण्यातील नवले पुलाजवळ दोन कंटेनरची झालेली धडक आणि त्यामध्ये एका कारचा झालेला भीषण अपघात तसेच त्यानंतर लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.

पुणे : शहरातील नवले (Pune) पुलावर झालेल्या भीषण अपघातात (Accident) 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तो ट्रक इतर वाहनांना घेऊन एका कंटनेवर जाऊन आदळला. त्यामुळे, घटनास्थळी कारमधील सीएनजीचा स्फोट होऊन आग लागल्याची भीषण दुर्घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अपघाताची दाहकता लक्षात येते. पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य केले. दरम्यान, या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी शोक व्यक्त केला आहे. तर, आमदार रोहित पवार यांनी शासनाने येथील पुलासंदर्भाने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पुण्यातील अपघाताच्या घटनेवर नेतेमंडळींकडून शोक व्यक्त केला जात आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ दोन कंटेनरची झालेली धडक आणि त्यामध्ये एका कारचा झालेला भीषण अपघात तसेच त्यानंतर लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी असून मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे म्हणत अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो, तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थनाही अजित पवार यांनी केली आहे. यासह आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली आहे.

पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे ट्विट करत मुख्यमंत्र्‍यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली.

नवले पूल हा ब्लॅक स्पॉट (Pune navele bridge accident)

पुण्यातला नवले पूल हे ठिकाण ब्लॅक स्पॉट बनलं असून इथं आतापर्यंत झालेल्या विविध अपघातात अनेक जणांचे बळी गेले आहेत. आजही झालेल्या विचित्र अपघात 9 हून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवले पुलावर होणारी वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांची वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. इथं वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत. शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

हेही वाचा

पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget