एक्स्प्लोर

Pune navale bridge: पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण

Pune navale bridge: कात्रज बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत तीव्र उतार आहे, त्यामुळे या रस्त्यावर यापूर्वी देखील अनेक अपघात घडलेले आहेत.

पुणे : पुण्यातील (Pune) नवले ब्रीजवर झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेनंतर प्रशासन आणि सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. वारंवार याच ठिकाणी अपघात होऊन निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपायोजना केली जात नाही. आमदार रोहित पवार आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळे, पुणेकरांकडून या अपघाताच्या (Accident) घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील नवले पूल हा अपघाताचा हॉट स्पॉट बनला असून आज सायंकाळी साडे पाचच्या सुमारास झालेल्या अपघातात जणांचा मृत्यू झाला आहे. साताराहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक पेटल्यानं भडका उडाला, त्यामुळे मृतांची संख्या वाढली, अपघाताची मिळताच अग्निशमन दलाचे जवान इथं दाखल झाले आहेत. तर, पुणे वाहतूक पोलीस (Police) आयुक्त मनोज पाटील यांनी अपघाताचे कारण सांगितले.

कात्रज बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत तीव्र उतार आहे, त्यामुळे या रस्त्यावर यापूर्वी देखील अनेक अपघात घडलेले आहेत. पुणे महानगरपालिका असेल, नॅशनल हायवे ऑथॉरिटी असेल वेळोवेळी प्रयत्न करतात, ह्या रस्त्यात सुधारणा आणण्यासाठी काम केलं जातय. या रस्त्यावर यापूर्वी अनेक अपघात याच भागात घडले आहेत हेही अगदी खरं आहे. याच परिसरात अनेक अपघातांमध्ये आतापर्यंत निष्पाप लोकांनी आपलं जीव गमावलं आहे. उतारामुळे गाड्यांचा वेग देखील अचानक वाढतो आणि गाड्या कंट्रोल होत नाहीत.या तीव्र उताराबद्दल प्रशासनासोबत आम्ही दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार करू, असे पुणे वाहतुकीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. तसेच, याअगोदर देखील या रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स, स्पीड गन्स वेगवेगळ्या उपयोजना करण्यात आल्या होत्या, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेकडून नवले ब्रिज येथे झालेल्या अपघातस्थळी मदतकार्य करण्यात येत आहे. अग्निशमन विभागाकडून आपत्ती व्यवस्थापनास नवले ब्रिज येथे अपघाताची माहिती मिळताच तात्काळ फायर ब्रिगेडच्या तीन फायर इंजिन एक ब्राउझर दोन रेस्क्यू व्हॅन तसेच पीएमआरडीएचे तीन फायर गाड्या व एक ब्राऊजर दोन रेस्क्यू व्हॅन अपघाताच्या ठिकाणी रवाना होऊन तात्काळ रेस्क्यूचे काम सुरू करण्यात आले. सदर रेस्क्यूच्या दरम्यान आवश्यक असणारी यंत्रसामुग्री जसे की क्रेन्स, जेसीबी व ॲम्बुलन्सेस याची तात्काळ व्यवस्था करून घटनास्थळी रवाना करून त्या ठिकाणी सर्च अंडर रेस्क्यू चे काम सुरू करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.

अग्निशमनचे 30 ते 35 जवान घटनास्थळी

सदर ठिकाणी लायगुडे दवाखाना व कमला नेहरू दावाखाना या ठिकाणावरील ॲम्बुलन्सडॉक्टर्सच्या टीम्स घटनास्थळी काम करत असून 108 क्रमांकाचे तीन ॲम्बुलन्स, पुणे मनपाच्या पाच ॲम्बुलन्सस कार्यरत आहेत. घटनास्थळावर पुणे महापालिकेचे मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री.ओमप्रकाश दिवटे तसेच क्षेत्रीय स्तरावरील उपायुक्त व महापालिका सहाय्यक आयुक्त अभियंते व सहाय्यक मनुष्यबळ कर्मचारी घटनेच्या ठिकाणी मदतकार्य करत आहेत. अग्निशमन दलाचे 35 ते 40 जवान तसेच क्षेत्रीय स्तरावरील 100 ते 110 अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी मदत कार्यामध्ये सहभागी आहेत.

अपघातातील जखमींवर विविध रुग्णालयात उपचार

अपघातात ज्या व्यक्ती जखमी झाल्या आहेत त्यांना Plus हॉस्पिटल, Silver Breach हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरु आहेत. सदर हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्त(इस्टेट) पृथ्वीराज बी.पी.,सहायक आरोग्य प्रमुख संजीव वावरे यांच्या समवेत सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) परमित कौर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन करण्यात येत असून या घटनेची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना देण्यात येत असून त्यांनी याबाबत दिलेल्या आदेशानुसार सर्व कामकाज करण्यात येत आहे. याप्रसंगी पुणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन ची संपूर्ण टीम कार्यरत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात ग्रस्त वाहने आहेत ती वाहने क्रेनने उचलण्याचे काम सुरू आहे. सफाई कर्मचारी यांच्या मार्फत ऑईली रस्ता झालेला असल्याने फायर फियटर लावून रोड स्वछ करण्यात येत आहे. रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने कामकाज करण्यात अडथळे येत आहेत.

हेही वाचा

पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget