एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ दीड लाख अर्ज, पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ आणि विरोधात आज मोठ्याप्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता.
Photo: छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ दीड लाख अर्ज, पाहा फोटो
1/11

औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात आक्षेप आणि हरकती दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
2/11

त्यामुळे आज विभागीय आयुक्त कार्यालयात मोठ्या प्रमाणावर विरोधात आणि समर्थनात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
3/11

दरम्यान सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने देखील आज विभागीय आयुक्त कार्यालयात नामांतराच्या समर्थनार्थ अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
4/11

काही वेळेपूर्वी सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या कार्यालयातून नामांतराच्या समर्थनार्थ भरलेले दीड लाख अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यासाठी कार्यकर्ते घेऊन निघाले आहेत.
5/11

समर्थनार्थ भरलेले दीड लाख अर्ज वेगवेगळ्या तीन गाड्यामधून घेऊन जाणार असल्याची माहिती सकल हिंदू एकत्रीकरण समितीचे राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे.
6/11

यासाठी एक-एक हजारचे वेगवेगळे गठ्ठे तयार करण्यात आले असून, ज्यात एकूण दीड लाख लाख अर्ज असल्याची माहिती देखील जंजाळ यांनी दिली आहे.
7/11

विभागीय आयुक्त कार्यालयात हे सर्व दीड लाख अर्ज दाखल करण्यात येत असून, सकल हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने हे सर्व अर्ज भरून घेण्यात आले होते.
8/11

तसेच अजूनही नामांतराच्या समर्थनार्थ भरलेले अर्ज दाखल होत असून, त्यांचे नंबरीकरन ते देखील आजच्या आज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती जंजाळ यांनी दिली आहे.
9/11

आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नामांतराविरोधात आणि समर्थनार्थ भरलेले अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करता येणार आहे.
10/11

अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, विभागीय आयुक्त कार्यालयात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे
11/11

सोबतच आजचा शेवटचा दिवस असल्याने अर्जांची संख्या देखील मोठी असणार आहे. त्यामुळे 25 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
Published at : 27 Mar 2023 02:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे























