एक्स्प्लोर
PHOTO: वंदे भारत एक्सप्रेसने देवेंद्र फडणवीस यांनी केला प्रवास
Vande Bharat Express : आज जालना रेल्वे स्थानकावरून जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

Devendra Fadnavis
1/10

आज जालना रेल्वे स्थानकावरून जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.यावेळी जालना येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
2/10

दरम्यान, याच रेल्वेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास केला.
3/10

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.
4/10

यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,आमदार हरीभाऊ बागडे,प्रशांत बंब, संजय सिरसाट उपस्थित होते.
5/10

जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात रेल्वेचे शालेय विध्यार्थी, रेल्वे प्रवाशी, स्थानिक नागरिकांनीही उत्साहात स्वागत केले.
6/10

मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशासाठी मुंबई येथे जाण्यासाठी ही रेल्वेची जलद सोय उपलब्ध झाली असल्याचे फडणवीस म्हणाले.
7/10

विशेष म्हणजे जालना-मुंबई मार्गावर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रातील सातवी आणि मराठवाड्याला मुंबईला जोडणारी पाचवी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस आहे.
8/10

तर, नव्या वर्षात ही गाडी एक जानेवारीपासून गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होईल.
9/10

मुंबई-जालना ही वंदे भारत एक्स्प्रेस आठवडय़ातून सहा दिवस धावणार आहे.
10/10

ही ट्रेन जालना रेल्वे स्थानकातून पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी बारा वाजता पोहोचेल.
Published at : 30 Dec 2023 04:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
