एक्स्प्लोर
Independence Day 2023: पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते औरंगाबादेत शासकीय ध्वजारोहण; पाहा फोटो
Aurangabad : स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Independence Day 2023
1/7

प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
2/7

या सोहळ्यास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.
3/7

पोलीस वाद्यवृंदाच्या सुरावटीवर राष्ट्रगीत आणि त्यानंतर राज्यगीत सादर झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना उद्देशून शुभेच्छा संदेश दिला.
4/7

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले.
5/7

मराठवाडा मुक्तीसंग्रामाबाबत नव्या पिढीपर्यंत माहिती पोहोचविणे, तसेच ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
6/7

जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना व अभियानांमधून लोकांपर्यंत अधिकाधिक लाभ पोहोचविण्यात येत आहे. जिल्ह्यात फलोत्पादन योजना, रोजगार हमी योजना सारख्या योजनांमधून तळागाळातील शेतकरी, ग्रामिण जनतेपर्यंत लाभ पोहोचविण्यात आल्याचे भुमरे म्हणाले.
7/7

तर, पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण जल उपसा सिंचन प्रकल्प भाग-2 मधील मौजे राहटगाव व सोलनापूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मावेजा धनादेश वाटप आज करण्यात आले
Published at : 15 Aug 2023 01:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
