एक्स्प्लोर
Photo : पावसाअभावी मका पीक करपू लागले, मराठवाड्यात भयंकर परिस्थिती
Aurangabad : आधी जून महिना आणि आता ऑगस्टही कोरडा गेल्याने मराठवाड्यावर (Marathwada) पाण्याचे मोठं संकट उभं राहिले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
Aurangabad Agriculture News
1/9

पावसानं ओढ दिल्याने काही दिवसांपूर्वी हिरवीगार दिसणारी पिकं आता अक्षरशः करपू लागली आहेत. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे.
2/9

वैजापूर तालुक्यातील शेकडो नव्हे तर हजारो एकरवरील पिकांची राख रांगोळी झाली आहे. पाऊस पडला नाही तर पुढच्या आठ दिवसात शेतकरी शेतातही जाणार नाही अशी परिस्थिती आहे.
3/9

स्वप्न डोळ्यादेखत खाक होताना त्याला पहावणार नाही, त्यामुळे आता शेतात येण्याचंच बंद करणार असल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे.
4/9

वैजापूरच्या लोणी खुर्द भागात मोठ्या प्रमाणात मक्याच्या पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने मका पीक अक्षरशः करपून गेली आहे.
5/9

त्यामुळे मुळापासून तर वरच्या शेंड्यापर्यंत मकाचे झाडं वाळून गेली आहे. झाडाला हात लावल्यावर त्याचा चुरा होताना दिसत आहे.
6/9

विशेष म्हणजे शेकडो एकरमध्ये अशीच परिस्थिती आहे. मोठा खर्च करून पीक जगवली, डोक्यापर्यंत वाढवली. पण आता त्याला फळ लागण्याची वेळ आल्यावर पिकं डोळ्यासमोर जळून जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
7/9

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच ओसंडून वाहणारी धरणे आता भर पावसाळ्यात भेगाळली आहेत. अनेक छोटे-मोठे पाझर तलाव कोरडीठाक पडली आहेत.
8/9

त्यामुळे गुराढोरांना पिण्यासाठी पाणी कुठून आणायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. दोन-चार गावांची तहान भागवण्यासाठी, शेतीला पाणी मिळावं यासाठी अनेक गावात पाझर तलाव बांधण्यात आली आहे.
9/9

मात्र वैजापूर तालुक्यातील सगळी पाझर तलाव कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे काही तलावातून गावांच्या पाणीपुरवठा योजनेला पाणी पुरवले जाते. पण, आता या गावांचा देखील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
Published at : 03 Sep 2023 06:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
व्यापार-उद्योग
























