एक्स्प्लोर

'बाबा मला मारलं म्हणत एक कोण तर दिल्लीला गेलं होतं' एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

“तांदळातून खडे निवडायचे का खड्यातून तांदूळ हे शिकवण्याचं काम शिक्षकांचंच आहे”, अशी जाणीव प्रत्येक पिढीला करून देणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

Uddhav Thackeray on Eknath Shinde: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. महायुतीमधील फोडाफोडीच्या राजकारणावर ते म्हणाले की, “एक कोणतरी गेलं, बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. ही लाचारी चांगला शिक्षक मिळाला असता तर आली नसती. तांदळातून खडे निवडायचे का खड्यातून तांदूळ हे शिकवण्याचं काम शिक्षकांचंच आहे”, अशी जाणीव प्रत्येक पिढीला करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

दिवट्यांना मशालीचं महत्त्व कळत नाही

उद्धव ठाकरे म्हणाले की, “दिवट्यांना मशालीचं महत्त्व कळत नाही. शिक्षण नसेल तर राजकारण हे फक्त तोडफोडीच्या भोवऱ्यात अडकतं.” आमदार निधीच्या वापराबाबत त्यांनी आमदारांना थेट आदेशवजा सूचना दिल्या की, “तुमचा निधी असेल तो फक्त शिक्षणासाठीच वापरा.”  “मुलांना तयार करण्याची जबाबदारीच नाही. पक्ष फोडायचे, आमदार-खासदार उडवायचे, खुर्ची मिळाली की बाकीचं जग खड्यात!” आजोबा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शाळा सोडण्याच्या प्रसंगाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी  सांगितले की, “शाळा सुटली तरी त्यांचं शिक्षण थांबलं नाही. संस्कारांचं मोल त्यांना माहिती होतं.” मुलांमध्ये येणारे संस्कार पालकांच्या वर्तनातूनच घडतात यावरही त्यांनी वेधक भाष्य केले. मातृभाषेवर प्रेम व्यक्त करत ते म्हणाले, “आपली अक्षरं आईने हात धरून गिरवली म्हणूनच तिला मातृभाषा म्हणतो.”

दुसरा देईल ते रेवडी, आम्ही दिलं तर उपकार

“रेवडी संस्कृती”वर त्यांनी कडाडून टीका केली. “आज राजकारण म्हणजे दुसरा देईल ते रेवडी, आम्ही दिलं तर उपकार. फुकट कॉम्प्युटर वाटणार, पण त्यात टाकणार काय? कोरी वही दिली तर कोणी होळ्या करेल, लिहायला काय देणार?” असे ते म्हणाले. मुलांवर वाढणाऱ्या दप्तराच्या ओझ्याचा उल्लेख करत त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न आठवले, “अरे, मुलं आहेत की गाढवं आहेत? एवढं ओझं का वाहायला लावता?”

वर्षांत महापालिकेचा बाप कोण हेच कळत नाही

मुंबई महापालिकेच्या सध्याच्या व्यवस्थेवरही त्यांनी थेट प्रहार केला. “गेल्या तीन-चार वर्षांत महापालिकेचा बाप कोण हेच कळत नाही. आत काय चाललंय, कोणालाच कळत नाही,” असा त्यांनी सवाल केला. मात्र, शिवसेनेच्या कार्यकाळात महापालिका शाळांमध्ये झालेले बदल आठवत त्यांनी सांगितले की, “आदित्यच्या कामामुळे पहिल्यांदाच महापालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या.” दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना मांडत त्यांनी “एक चांगला शिक्षक स्टुडिओतून सर्व शाळांना शिकवू शकतो,” असे सांगितले. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख मांडताना त्यांनी एका शेतकरी महिलेची वेदना व्यक्त केली. “मुलींचं शिक्षण फुकट आहे म्हणतात, पण फी भरायला पैसे नाहीत. घरात काहीच नाही, मुलींना शिकवायचं कसं?” या कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेने घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Manoj Jarange Patil Maratha Reservation: मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा, म्हणाले, 'आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा!'
मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा, म्हणाले, 'आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा!'
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
BMC Mumbai: मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
Embed widget