एक्स्प्लोर

Tamhini ghat: 20 दिवसांपूर्वीच घेतलेली 'थार' ताम्हिणी घाटात कोसळली, दोन दिवसांनी घटना समोर; 4 जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातल्या ताम्हिणी घाटामध्ये एक थार कार 500 फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. थार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली

रायगड : पुण्यावरुन कोकणात जाताना रायगड (Raigad) जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात थार कारचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. चक्क 500 फूट खोल दरीत ही थार कार कोसळली. या दुर्घटनेत कारमधील 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि रेस्क्यू टीमकडून थारमधील इतरांसाठी शोध मोहीम राबविण्यात आली. परवा मंगळवारी रात्री हा अपघात झाला असून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर आज ही घटना उघडकीस आली. दरम्यान, 20 दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन थार कार घेऊन हे पर्यटक कोकणात फिरायला निघाले होते. मात्र, या तरुणांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. 

रायगड जिल्ह्यातल्या ताम्हिणी घाटामध्ये एक थार कार 500 फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. थार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. या कारमधून एकूण 6 प्रवाशी प्रवास करत होते. परवा मंगळवारी रात्री हा अपघात झाला होता. मात्र, बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यांचे लोकेशन रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात सापडल्याने आज या घटनास्थळी शोध सुरू करण्यात आला. शोधमोहीमेत आतापर्यंत चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत. मात्र, उर्वरित 2 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सह्याद्री वन्यजीव सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमकडून या अपघातातील बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. बेपत्ता झालेले सर्व पुरुष असल्याचीही माहिती समोर आलीय.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात आला. तसेच, अपघाताचे नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्रथमदर्शनी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानेच गाडी दरीत कोसळली असावी. ड्रोनद्वारे परिसराची तपासणी सुरू असून चार मृतदेह आढळून आले आहेत. ते वर आणण्याचे काम सुरू आहे. बचाव पथक दोरखंड, क्रेन आणि इतर उपकरणांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. वाहनात आणखी प्रवासी होते का, याचा तपासही सुरू असल्याची माहिती माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी दिली. दरम्यान, मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 

हेही वाचा 

CM नितीश कुमारांपेक्षा 30 पट जास्त संपत्ती, कोण आहेत मंत्री रमा निषाद, बिहारमधील भाजपचा चेहरा?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget