एक्स्प्लोर

Bihar CM Nitish Kumar Oath मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए भाजप आघाडीला मोठं बहुमत मिळालं असून 243 जागांपैकी 202 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने येथील निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, भाजप सर्वाधिक जागा जिंकत येथे मोठा भाऊ बनल्याचं दिसून आलं. त्यामुळे, बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर (chief minister) कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता देशाला होता. अखेर, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार (Nitish kumar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी 10 वेळा शपथ घेऊन सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री बनण्याचा नवा विक्रम रचला आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात मोठ्या जनसमुदायासमोर हा शपथविधी संपन्न झाला. 

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि नितीश कुमार यांच्या जयदूने प्रत्येकी 102 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी, भाजपने 89 तर जदयूने 85 जागांवर विजय मिळवला. तर, चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला 19 जागा जिंकता आल्याने 202 जागांसह मोठं बहुमत एनडीए आघाडीला मिळाले. त्यानंतर आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांनी 10 व्यांदा शपथ घेतली, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळ येऊन नितीश कुमार यांचे अभिनंदन केले. तर, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच, इतरही मंत्र्यांचा शपधविधी संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मंत्र्यांचे अभिनंदन केले. या शपथविधी सोहळ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित होते. 

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भाजप एनडीने निवडणुका लढवल्या. पण, सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. कारण, भाजपने महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या होत्या. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाला महाराष्ट्रात 57 जागा जिंकता आल्या, तर भाजपने 132 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे, अर्थातच भाजपच महाराष्ट्रातही मोठा भाऊ ठरला. त्यानंतर, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री बनले, तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. त्यामुळे, आता बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाईल की नितीश कुमार यांना संधी मिळेल याची चर्चा होती. अखेर, नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Embed widget