एक्स्प्लोर

Anil Ambani : अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का, नव्यानं 1400 कोटींची संपत्ती जप्त, आतापर्यंत 9000 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच

Anil Ambani: अनिल अंबानी यांच्या नेतृत्त्वातील रिलायन्स ग्रुपवर ईडीची कारवाई सुरु आहे. आतापर्यंत ईडीकडून रिलायन्स ग्रुपची 9000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढत आहेत. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं रिलायन्स ग्रुपशी संबंधित 1400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. आतापर्यंत ईडीनं अनिल अंबानी यांची एकूण 9000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. 

ईडीनं नव्या आदेशान्वये अनिल अंबानी ग्रुप ऑफ कंपनीजशी संबंधित 1400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीनं यापूर्वी  7500 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. मुकेश अंबानी यांच्या नव्यानं जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता नवी मुंबई, चेन्नई, पुणे आणि भुवनेश्वर येथील आहेत. 

Anil Ambani Assests Attached By ED : अनिल अंबानींची संपत्ती ईडीकडून जप्त

31 ऑक्टोबर 2025 ला जारी करण्यात आलेल्या 5(1) च्या आदेशानुसार रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडकडून जमा केलेल्या सार्वजनिक  पैशांचा कथित दुरुपयोग केल्या प्रकरणी यापूर्वी रिलायन्स ग्रुपच्या 40 हून अधिक संपत्ती अस्थायी रुपयात जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबईतील वांद्रे पश्चिम, पाली हिल येथील एका घराचा समावेश होता.  

अनिल अंबानी रिलायन्स ग्रुपकडून ईडीकडून होत असलेल्या कारवाईच्या संदर्भात स्पष्टीकरण जारी केलं जात आहे. ईडीच्या कारवाईमुळं उद्योगावर परिणाम झाला नसल्याचं सांगितलं जातंय. कंपनीनं काही दिवसांपूर्वी स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार ईडीनं जप्त केलेली संपत्ती रिलायन्स कम्युनिकेशन्सची आहे. ही कंपनी 6 वर्षानंतर सीआयआरपी तून जात आहे. रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्राच्या  भविष्यावर कोणता परिणाम होणार नाही. ईडीनं अनिल अंबानी यांना चौकशीसाठी 14 नोव्हेंबरला कार्यालयात बोलावलं होतं. 

आरएचएफएल आणि आरसीएफएलद्वारे जमा करण्यात आलेली सार्वजनिक रक्कम अनिल अंबानींशी संबंधित संस्थांमध्ये वर्ग करत मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपानं अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या आहेत. 

अनिल अंबनी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा शेअर 4.92 टक्क्यांच्या घसरणीसह 170.53 रुपयांवर पोहोचला आहे. तर, रिलायन्स पॉवरचा शेअर 1.53 टक्क्यांच्या घसरणीसह 39.32 रुपयांवर पोहोचला आहे. ईडीच्या नव्या कारवाईनंतर रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरवर काय परिणाम होतो ते पाहावं लागेल.
 
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget