एक्स्प्लोर
आंध्र प्रदेशमधील साई भक्ताकडून शिर्डीत सोन्याचा मुकुट दान; किंमत ऐकून थक्क व्हाल, पाहा खास PHOTOS
Shirdi News : दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश येथील एका साईभक्ताने ६८ लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट दान दिला असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
Shirdi News
1/10

साईबाबांच्या खजिन्यात दिवसेंदिवस मौल्यवान हिरे, सोने चांदी याबरोबरच रोख स्वरुपात पैसे यांचे मोठे दान साईभक्तांकडून जमा होत आहे.
2/10

साईबाबांच्या चरणी देश विदेशातील कोट्यावधी भाविक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी सदैव झोळीत भरभरून दान देत असतात.
3/10

यामध्ये सोने, चांदी, हिरे तसेच रोख रक्कम यासह इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश असतो.
4/10

मागील काही वर्षांपासून भाविकांकडून दानात येणाऱ्या साईबाबांच्या सुवर्ण मुकुटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
5/10

शनिवारी आंध्रप्रदेश मधील गुंटूर येथील एका साईभक्ताने साईचरणी 788.44 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला.
6/10

या मुकुटाची किंमत ६८ लाख रुपये असून आत साईबाबा संस्थानकडे सुवर्ण मुकुटांची संख्या 28 वर पोहचली आहे.
7/10

हा सुवर्ण मुकूट 2025 मधील सर्वाधिक मौल्यवान दान म्हणून ओळखला जात आहे.
8/10

या मुकूटावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं असून त्यामध्ये डायमंडने कोरलेलं ‘ॐ’ हे चिन्ह विशेष लक्ष वेधून घेत आहे.
9/10

विशेष म्हणजे, या मुकूटाचे दान करणाऱ्या भक्ताने आपलं नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली आहे.
10/10

साईसंस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी भाविकाचा सत्कार करत आभार मानले आहे.
Published at : 20 Apr 2025 09:30 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























