एक्स्प्लोर
शिर्डीतील मंदिरात बैलपोळा उत्साहात; साईचरणी भाविकाकडून सोन्याचे कडे अर्पण, किंमत किती?
राज्यभरात आज बैलपोळा सणाचा उत्साह बघायला मिळत असून शिर्डीतील साईमंदिरातही पारंपारीक पद्धतीने बैलपोळा साजरा केला जात आहे.
Shirdi saibaba donate gold wheel bailpola
1/9

राज्यभरात आज बैलपोळा सणाचा उत्साह बघायला मिळत असून शिर्डीतील साईमंदिरातही पारंपारीक पद्धतीने बैलपोळा साजरा केला जात आहे.
2/9

श्री साईबाबांच्या समाधीवर बैलाच्या मूर्ती ठेवण्यात आल्या असून गोड नैवेद्य दाखवून आरतीही करण्यात आली. साईबाबांच्या मूर्तीसमोर असलेली बैलांची जोडी दिमाखदार आणि आकर्षक आहे.
3/9

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्याया भाविकांना समाधीवर सर्जा-राजाचेही दर्शन होत आहे. त्यामुळे, बैलपोळा सणासह बाबांच्या दर्शनाचा दुग्धशर्करा योग भाविकांना लाभत आहे.
4/9

साईचरणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांपैकी आज कर्नाटक येथून आलेल्या साईभक्त व्यंकप्पा घोडके यांनी 56 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे साईचरणी अर्पण केले.
5/9

अतिशय सुंदर कलाकुसर असलेल्या या सुवर्ण कड्याची किंमत जवळपास पाच लाख रूपये एवढी असून आपण साईबाबांचे मोठे भक्त आहोत, त्यांची सदैव कृपा आपल्यावर आहे, असे घोडके यांनी म्हटले.
6/9

व्यकंप्पा घोडके यांनी साईसमाधीचे दर्शन घेत हे सोन्याचे कडे अर्पण केले, त्यानंतर साईबाबा संस्थानकडून देणगीदार साईभक्तांचा सत्कार करण्यात आला
7/9

दरम्यान, साईबाबांच्या पायात हे सोन्याचे कडे घालण्यात आल्याचंही यावेळी दिसून आलं. शिर्डी साईंच्या दर्शनासाठी येणारे भाविक मनोभावे साईचरणी दान अर्पण करतात
8/9

शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला सणवार आणि सुट्टींच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते, त्यावेळी भरभरुन दानही अर्पण केले जाते
9/9

दरम्यान, नववर्षाच्या स्वागत दिनी म्हणजेच जानेवारी महिन्यात दरवर्षी मोठ्या संख्येने देशभरातून भाविक साईंच्या दर्शनासाठी येतात आणि दान अर्पण करतात
Published at : 22 Aug 2025 02:45 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
भारत
बातम्या
























