लोकांमध्ये कोरोनाची भीती कायम आहे. कोरोनाचा संसर्ग दररोज लाखो लोकांना होत आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञांकडून मास्क लावण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र काही लोक मास्कचा योग्य वापर करत नाहीत.
2/6
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने मास्कच्या वापराबाबत अनेक सूचना दिल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही दिवसभर मास्क वापरत असाल तर तो पुन्हा घालू नये. ते घातक ठरू शकतं. यासोबतच संपूर्ण तोंड झाकले जाईल असाच मास्क वापरावा. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क हे सर्वात मोठे शस्त्र आहे.
3/6
मास्क कसा वापरायचा? : जर तुम्ही थोडा वेळ मास्क घातला असेल तर तो स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येईल, मास्क जर फाटला असेल किंवा सैल झाला असेल तर तो वापरू नये, खूप मोठा किंवा खूप लहान मास्क वापरू नये.
4/6
मास्क सतत बदलत राहिले पाहिजे, मास्क काढल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, मास्क काढताना त्याला तोंडाच्या भागाने स्पर्श करू नका.
5/6
मास्क लावल्यानंतर खोकला किंवा शिंक येत असेल तर तो मास्क पुन्हा वापरू नये, मास्क पुन्हा वापरायचा असेल तर तो खिशात किंवा टेबलावर ठेवू नये, कागदाच्या पिशवीत दुमडून ठेवा.
6/6
जर मास्कमध्ये ओलावा असेल तर तो वापरू नये, नेहमी कोरडा मास्क वापरावा, सैल आणि अयोग्य आणि गलिच्छ मास्क वापरू नका.