एक्स्प्लोर

Devendra Fadnavis On Ajit Pawar: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारीख कुणी ठरवली?; देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच केला खुलासा

Devendra Fadnavis On Ajit Pawar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात विविध विषयांवर भाष्य केलं.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या काळात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अनेक चर्चा देखील समोर आले. अजित पवार-शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या बैठकीचा व्हिडिओही व्हायरल झाला. त्यात सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी इतकी घाई का करण्यात आला? यावरून विरोधकांनी टीका देखील केली, त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीचा होता. तो आम्ही घेतला नव्हता असं सांगत मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात विविध विषयांवर भाष्य केलं.(Devendra Fadnavis On Ajit Pawar)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्याबाबत जो निर्णय घेतला गेला त्यात आमच्या पक्षाचा सहभाग नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते नेत्यांनी मला माहिती दिली. कागदपत्रांसह ते नेते माझ्याकडे आले आणि त्यांनी एक तारीख दिली. त्यावर माझा कुठलाही आक्षेप नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि ते आम्ही मान्य केले. तो निर्णय हा त्यांच्या पक्षाचा होता, आमचा निर्णय नव्हता असंही त्यांनी सांगितलं आहे.

तसेच विलीनीकरणाबाबत बैठकीचा व्हिडिओ समोर आला त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पक्षात विलीनीकरणाची चर्चा सुरू होती तर त्याच्याशी आमचा संबंध नव्हता. जर असा निर्णय झाला असता तर अजितदादांना आमचा सल्ला घ्यावा लागला असता कारण आम्ही मित्रपक्ष आहोत. परंतु माझ्यासोबत अजितदादांची अशी कुठलीही चर्चा झाली नव्हती. जर काही सीक्रेट असेल तर त्याबाबत माहिती नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अपघात की घातपात यावरूती फडणवीस म्हणाले की...

रोहित पवारांनी ज्या शंका उपस्थित केल्या, त्यावर बोलताना रोहित पवार यांनीही आज माझी भेट घेऊन काही मुद्दे मांडले आहेत. त्यांनी दिलेल्या पत्राला मी माझे पत्र जोडून या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी डीजीसीएकडे करणार असल्याचं मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले. तर, ह्या अपघातावर तुम्हाला संशय वाटतो का? असाही प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर, जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा आपण कुठलीही पतंगबाजी करायला नाही पाहिजे. कारण, हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. दुर्दैवाने जी व्यक्ती मृत आहे, त्या व्यक्तीच्या पद-प्रतिष्ठेचाही विचार आपण करायला पाहिजे. तसेच, कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही विचार करायला पाहिजे. त्यामुळे, याविषयी कुठलीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करायला नाही पाहिजे, असे मला वाटते, अशा शब्दात फडणवीसांनी उत्तर दिले. त्यामुळे, याप्रश्नावर मी अधिक बोलू इच्छित नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Embed widget