एक्स्प्लोर
In Pics : भारतीय रेल्वेचे पहिले पॉड हॉटेल, फोटो पाहून व्हाल आश्यर्यचकित
railway
1/6

भारतीय रेल्वे जागतिक दर्जाच्या सुविधांसह स्वतःला अपग्रेड करत आहे, याची नवीन उदाहरणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतेच भोपाळमधील हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून विमानतळासारख्या सुविधांनी युक्त कमलापती रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. गांधीनगर रेल्वे स्थानकावरून रेल्वेच्या अपग्रेडेशनचे काही फोटोही पाहायला मिळाले. या मध्ये आता मुंबईचे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन देखील सामील केले गेले आहे जिथे भारतीय रेल्वेचे पहिले पॉड हॉटेल्स किंवा पॉड रूम सुरू करण्यात आल्या आहेत. हे अल्ट्रा मॉडर्न पॉड रूम किंवा हॉटेल्स अमेरिका आणि जपानमध्ये बनवलेल्या पॉड हॉटेल्सप्रमाणेच आलिशान आहेत. पाहा त्याचे जबरदस्त फोटो जे तुम्हाला रेल्वेच्या या उपक्रमाचे चाहते बनतील.
2/6

येथील हॉटेल्स आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून जपानच्या पॉड हॉटेल्सच्या धर्तीवर विकसित करण्यात आली आहेत. त्यांने फोटो रेल्वे मंत्री आणि IRCTC च्या ट्विटद्वारे घेण्यात आली आहेत. फोटो क्रेडिट- irctc twitter
Published at : 18 Nov 2021 02:23 PM (IST)
आणखी पाहा























