एक्स्प्लोर
Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट आरोग्यासाठी गुणकारी; सेवन केल्यास 'या' आजारांपासून राहाल दूर
Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट शरीरासाठी फार गुणकारी आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस ड्रॅगन फ्रूटची बाजारात मागणी फार वाढतेय.
Dragon Fruit
1/9

ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.
2/9

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेकजण ड्रॅगन फ्रूटचा वापर करत होते. वाचा याचे अन्य फायदे.
3/9

ड्रॅगन फ्रूट्स त्वचेशी संबंधित विकार दूर करण्यासाठी खूप आरोग्यदायी आहेत. या फळापासून तुम्ही नैसर्गिक फेस पॅक तयार करू शकता, ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते.
4/9

ड्रॅगन फ्रूट गर्भधारणेदरम्यान अॅनिमियावर मात करण्यास मदत करते. गरोदरपणात कमी हिमोग्लोबिनमुळे बालमृत्यू, जन्मत: कमी वजन आणि गर्भपात यांसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होते.
5/9

ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. फायबर समृद्ध ड्रॅगन फळ चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेस गती देते.
6/9

ड्रॅगन फळामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे सांधे आणि स्नायूंच्या तीव्र वेदनापासून आराम देऊ शकतात. ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सला तटस्थ करतात आणि जळजळ कमी करतात.
7/9

ड्रॅगन फळ जळजळ प्रतिबंधित करते. जर तुम्हाला सांधेदुखीमुळे तीव्र वेदना होत असतील तर डॉक्टर तुम्हाला ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला देतात.
8/9

ड्रॅगन फळ तुमच्या त्वचेसाठी फार फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे निरोगी त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले व्हिटॅमिन सी सनबर्न कमी करण्यास आणि जळलेल्या भागात संसर्ग टाळण्यास मदत करते.
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 01 Dec 2022 08:17 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
राजकारण
क्रिकेट




















