एक्स्प्लोर
Donkey Milk Soap: गाढविणीच्या दुधाच्या साबणाची जागतिक मागणी वाढली! जाणून घ्या याचे फायदे...
donkey milk soap: गाढविणीच्या दुधाचा साबण अनेक देशांत वापरला जातो आणि याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
जगभरात वाढली गाढविणीच्या दुधाच्या साबणाची मागणी ! जाणून घ्या फायदे...
1/8

अरब अमिराती आणि इतर अनेक देशांमध्ये गाढवाच्या दुधाचा साबण मोठ्या प्रमाणात विकला जातो. दुबईसारख्या देशांत याचे प्रीमियम ब्रँड्स उपलब्ध असून तो मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.
2/8

गाढविणीच्या दुधात भरपूर खनिजे आणि प्रथिने असतात. ही खनिजे त्वचेला पोषण देतात आणि त्वचा मऊ ठेवण्यात मदत करतात.
3/8

या दुधात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे संरक्षण करतात आणि हानिकारक घटकांपासून त्वचा सुरक्षित ठेवतात.
4/8

सूर्यप्रकाश आणि वाढत्या वयामुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यास हा साबण मदत करतो. नियमित वापराने त्वचेचा रंग एकसारखा दिसू लागतो आणि लहान सुरकुत्याही कमी जाणवतात.
5/8

गाढविणीचे दूध त्वचेतील पेशी पुन्हा जिवंत करतं आणि त्वचेच्या समस्या दूर करतं. त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसते .
6/8

असं म्हणतात की गाढविणीच्या दुधाच्या साबणाने आंघोळ केल्यास त्वचेवरील डाग, मुरमे आणि सुरकुत्या कमी होऊ शकतात. यामुळे तो स्किन-केअरमध्ये एक खास पर्याय मानला जातो.
7/8

दुबईमध्ये तर गाढविणीच्या दुधापासून बनवलेले विविध ब्रँड्सचे साबण मोठ्या प्रमाणात विकले जातात. काही ब्रँड्स तर याला लक्झरी स्किनकेअर उत्पादन म्हणूनही प्रमोट करतात.
8/8

(टीप: वरील माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही.)
Published at : 18 Nov 2025 01:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र























