डोनेशियातील श्रीविजया एअरलाइन्सच्या या विमानात एकूण 56 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. विमान पश्चिम कालीमंतनची प्रांतीय राजधानी पोंटियानकच्या दिशेने जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅश झालेले बोईंग विमान 26 वर्ष जुने होते होते.
2/8
उड्डाण केल्यानंतर काही मिनिटात विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. जर्कातावरुन उड्डाण केल्यानंतर श्रीविजय एअरचे प्रवासी विमान अवघ्या चार मिनिटात 10 हजार फूट उंचीपर्यंत पोहोचले होते. पण अवघ्या एका मिनिटात ते 10 हजार फुटापेक्षा पण खाली आले आहे.
3/8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशिया येथे विमान अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान म्हणाले, “इंडोनेशियात दुर्देवी विमान दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी तीव्र सहवेदनेने सहभागी आहे. या दुःखाच्या घटनेत भारत इंडोनियाच्यासोबत आहे.”
4/8
राष्ट्रपती जोको विडोडो म्हणाले की, मी सरकार आणि सर्व इंडोनेशियन जनतेच्या वतीने या घटनेबद्दल शोक व्यक्त करतो. परिवहन मंत्री बी.के. सुमडी म्हणाले की, अपघाताच्या जागेचा अंदाज घेत अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे.
5/8
रविवारी सकाळी बचाव पथकाच्या सदस्यांना जावा समुद्रातून मानवी अवशेष, फाटलेले कपडे आणि धातूचे काही तुकडे आढळले.
6/8
इंडोनेशियाचे एअर चीफ मार्शल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं की, विमानातील काही भाग याठिकाणी आढळल्याने आम्हाला खात्री आहे की याच ठिकाण विमानाचा अपघात झाला. विमानाचा काही भाग सापडला आहे ज्यावर नोंदणी क्रमांक लिहिला आहे.
7/8
ब्लॅक बॉक्समध्ये फ्लाइट डेटा, तसेच वैमानिकांमधील संभाषणे तसेच त्यांच्या आणि हवाई वाहतूक नियंत्रण टॉवर दरम्यानच्या संवादाची नोंद आहे. ब्लॅक बॉक्समधून अपघाताचे कारण जाणून घेण्यास मदत होते.
8/8
इंडोनेशियात बोईंग 737-500 विमान शनिवारी अपघातग्रस्त झालं. जावा समुद्रात 23 मीटर खोलवर कोसळलेल्या विमानाचा ढिगारा सापडला असून या विमानात 62 प्रवासी प्रवास करत होते. विमानाचा ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर सापडला असल्याचं इंडोनेशिया सरकारने सांगितलं आहे.