एक्स्प्लोर
बॉलिवूडमध्ये अपयश, घरच्यांनी साथ सोडली, मेंटल हॉस्पिटमध्ये काढले दिवस; आता कुठे आहेत अभिनेते राज किरण?
Feature_Photo_4
1/5

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक कलाकार येतात आणि जातात. काही जण आपली वेगळी ओळख निर्माण करतात तर काहीजण आले तसेच जातात. असाच एक कलाकार होता राज किरण. राज किरण यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत कर्ज चित्रपटात काम केले होते.
2/5

राज किरण यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाविषयी सांगायचं तर त्यांनी 80 च्या दशकात बी.आर. इशाराच्या यांच्या कागज की नाव या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कर्ज शिवाय 'बसेरा', 'अर्थ', 'राज तिलक' यासारख्या सिनेमांमध्ये त्यांनी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केली.
3/5

90 च्या दशकाच्या उत्तरार्धात राज किरण यांची फिल्मी कारकीर्द उतारणीला लागली. त्यानंतर त्यांनी शेखर सुमनच्या टीव्ही शोमधून टीव्ही जगतात प्रवेश केला. दरम्यान राज किरण हे डिप्रेशनमध्ये गेले. त्यामुळे त्यांना मुंबईतील भायखळा मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
4/5

यानंतर राज किरण चित्रपटसृष्टीतून गायब झाले. ते कुठे होते कुणालाही माहिती नव्हते. काही वर्षानंतर ते अमेरिकेत असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान त्यांचे कुटुंबिय देखील त्यांना सोडून गेले. काही वर्षांनंतर दीप्ती नवल यांनी राज यांना शोधण्यासाठी मोहिम राबवली. त्यांनी फेसबुकवर लिहिले की, "मी सिनेसृष्टीतील माझा मित्र राज किरणचा शोध घेत आहे. मी ऐकलं आहे की ते न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवत आहेत. याबद्दल कुणाला माहिती असल्यास कळवा."
5/5

यानंतर ऋषी कपूर अमेरिकेत गेले त्यावेळी राज किरण यांचा भाऊ गोबिंद यांनी त्यांना सांगितले की राज अटलांटाच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. 2011 मध्ये राज यांचे कुटुंबीय पुढे आले आणि त्यांनी सांगितले राज बेपत्ता असल्याची तक्रार आम्ही दिली होती. त्यानंतर ते अटलांटामध्ये सापडले. मात्र, त्यानंतर तब्बल 10 वर्षे उलटून गेली आहेत आणि राज किरण आता कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही.
Published at : 27 May 2021 07:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
करमणूक
मुंबई
























