एक्स्प्लोर
पाणी मागण्याच्या बहाण्याने आत शिरले, मंगळसूत्र ओढून पसार चोरांना नाशिक पोलिसांनी पकडलं, चोरट्यांनी दिली भलतीच कबुली
नाशिकच्या रामवाडी परिसरात चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचा पाठलाग केला व इमारतीत प्रवेश केला.
Nashik Crime
1/7

नाशिकच्या रामवाडी परिसरात चोरट्यांनी पाणी मागत घरात शिरून महिलेला फसवत गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
2/7

गुन्हे शाखा १ च्या पथकाने सापळा रचून दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या.
3/7

फॉरेक्स आणि शेअर ट्रेडिंगमध्ये तोटा झाल्याने आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
4/7

प्रथमेश उशीर आणि जोएल म्हस्के अशी संशयितांची नावे असून, उपनगरमधील पाडेकर गॅस एजन्सीजवळून त्यांना अटक करण्यात आली.
5/7

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चोरी केलेलं मंगळसूत्र असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे.
6/7

पाण्याची बाटली परत करताना, महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची पोत खेचली. त्यामुळे दोघेही चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले.
7/7

पीडित महिला नंदिनी नायक यांनी जोरदार प्रतिकार केला, एका चोरट्याचा शर्ट ओढून पकडण्याचा प्रयत्न केला.
Published at : 16 Sep 2025 04:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























