एक्स्प्लोर

लाडकी बहीण योजनेचा लाभ 'भावाला', अर्ज न करताही चक्क पुरुषाच्या खात्यावर जमा झाले पैसे, तरुणही हबकला

Mukhyamantri Ladki Bahin Yojana :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या भलतीच चर्चेत आहे. पण यवतमाळच्या आर्णीत ही योजना वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. महिलांसाठी सुरु झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झाले आहेत.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या भलतीच चर्चेत आहे. पण यवतमाळच्या आर्णीत ही योजना वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. महिलांसाठी सुरु झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली तरी ही त्यांच्या खात्यात तीन हजार रूपये जमा झाले. जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या खात्यात पैसे जमा झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील रहिवासी आहे. 

अर्ज न करताही चक्क पुरुषाच्या खात्यावर जमा झाले पैसे

सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफर शेख याने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता. तरीही त्याच्या  बँक ऑफ बडोदा या बँक खात्यात या योजनेचे 3 हजार रुपये शासनाने जमा केले आहे. या प्रकाराने खुद्द जाफरही हबकून केला आहे. अनेक महिलांनी गर्दीत लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांची धावपळ सुरु होती. मात्र आधार लिंक नसल्याच्या कारणाखाली अजूनही अनेक महिलांचे पैसे जमा झालेले नाही. पण जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केलेला नसताना त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याने शासनाच्या कारभाराबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

मी कोणताही अर्ज केलेला नाही तरी पैसे माझ्या खात्यात कसे जमा झाले?

पैसे जमा झालेला तरुण म्हणाला की, महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी महिलांच्या खात्यात या योजनेचे 3 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तसाच एक मेसेज मला सुद्धा आला आहे. माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचा हा मेसेज आहे. बँक ऑफ बडोदामध्ये माझं खातं आहे. मी हे खातं 2012 ला उघडलं होतं. पंरतु माझ्या गावापासून ते खूप दूर असल्या कारणाने मी व्यवहार करत नाही. परंतु मेसेज आल्यानंतर मी यवतमाळला आलो. इथे आल्यानंतर मी खात्याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर माझ्या खात्याची चौकशी करावी लागेल असं सांगण्यात आलं. परंतु मी व्यवस्थापकांना सांगून मी स्टेटमेंट घेतलं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये माझ्या खात्यावर जमा झाले आहेत. मी कोणताही अर्ज केलेला नाही तरी पैसे माझ्या खात्यात कसे जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अटल सेतूवर गाडी थांबवली, समुद्रात उडी मारली, पोलिसांनी केसाला धरुन ओढलं, पुढं काय घडलं, पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 07 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Embed widget